जिल्हयात 21 जुन ते 01 जुलै 2021 या कालावधीत कृषि संजीवनी मोहीम राबवावी

 



 जिल्हयात 21 जुन ते 01 जुलै 2021 या कालावधीत

कृषि संजीवनी मोहीम राबवावी








             लातूर,दि.21 (जिमाका) लातूर जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना कळविण्यात येते की, दिनांक दि. 21 जुन ते 01 जुलै 2021 पर्यंत कृषी विभागामार्फत कृषी संजीवनी मोहीम राबविण्यात येणार आहे. खरीप हंगाम 2021 यशस्वी करण्यासाठी व आधुनिक कृषि तंत्रज्ञान शेतक-यापर्यंत पोहचविण्यासाठी व सदर मोहिमेअंतर्गत महत्वाच्या खरीप पिकांचे लागवड तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि कृषी विभागाच्या योजनांबाबत शेतकऱ्यांना शेतीशाळाकार्यशाळाचर्चासत्रे, वेबिनारप्रशिक्षणाचे आयोजन जिल्ह्यातील कृषि विभागाचे अधिकारी / कर्मचारी, कृषि विभाग- जिल्हा परिषद, कृषि विद्यापीठे / कृषि विज्ञान केंद्रे यांचे शास्त्रज्ञ, कृषिमित्र हे शेतक-यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करणार आहेत.

       दि. 21 जुन ते 01 जुलै 2021 या कालावधीत कृषि संजीवनी मोहीम खालील वेळापत्रकाप्रमाणे राबविण्यात येणार आहे. संपुर्ण जिल्ह्यात एकाच दिवशी एकाच मोहीमीची प्रचार व प्रसिद्धी करण्यात येणार आहे तरी जिल्ह्यातील सर्व शेतक-यांनी सदर मोहीमेचा लाभ घ्यावा. तसेच अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, लातूर यांनी केले आहे.

 दि. 21 जुन 2021 – BBF लागवड तंत्रज्ञान (रुंद वरंबा सरी तंत्रज्ञान), दि. 22 जुन 2021 – बीजप्रक्रीया. दि. 23 जुन 2021 – जमिन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा संतुलीत वापरदि. 24 जुन 2021 – कापुस एक गाव एक वाण (कापुस पिकाचे क्षेत्र असणा-या तालुक्यासाठी) / भात लागवड तंत्रज्ञान (भात पिकाचे क्षेत्र असणा-या तालुक्यासाठी) / ऊस लागवड तंत्रज्ञान (ऊस पिक असलेल्या तालुक्यासाठी) / कडधान्य व तेलबिया क्षेत्रात आंतरपीक तंत्रज्ञान (कडधान्य व तेलबिया क्षेत्र असणा-या तालुकत्यासाठी), दि. 25 जुन 2021 - विकेल ते पिकेल दि. 28 जुन 2021 – महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड व तंत्रज्ञान प्रसारदि. 29 जुन 2021 – तालुक्यातील दोन पिकात उत्पादकता वाढीसाठी रिसोर्स बॅंकेतील शेतक-यांचा सहभाग  दि. 30 जुन 2021 – तालुक्यातील महत्वाच्या पिकांची कीड व रोग नियंत्रणाच्या उपाययोजना  दि. 1 जुलै 2021 - कृषी दिन आणि मोहीमेचा समारोप कार्यक्रम

   सदर मोहीमेची कार्यपद्धती, सुक्ष्म नियोजन, सनियंत्रण व पर्यवेक्षण करण्याच्या सविस्तर मार्गदर्शक सुचना तालुका कृषि कार्यालयात उपलब्ध आहेत.

 

वृत्त क्र.508                                                दिनांक:-21 जून 2021


जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्याकडून  

निलंगा तालुक्यात पीक पाहणी

       लातूर,दि.21 (जिमाका)   दि.20 जून २०२१ रोजी निलंगा तालुक्यातील निलंगाऔराद  कासार शिरसी कृषि मंडळा मध्ये जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गवसाने यांनी खरीप हंगामातील विविध पिकाची पीक पेरणी  पीक परिस्थिती ची पाहणी करून कृषी अधिकारी  कर्मचाऱ्यांना सोयाबीन पीक पेरणी मध्ये बि बि एफ चा वापर,पट्टा पद्धत  टोकण पद्धतीने लागवड तसेच रुंद सरी वरंभा वर सोयाबीन  तूर पिकांची लागवड या बाबीचा अवलंब करण्याच्या सक्त सूचना दिल्या. निलंगा तालुक्यातील त्यांच्या दौऱ्यात बळीराजा शेतकरी गट यांची विकेल ते पिकेल अंतर्गत बोरसुरी डाळ याचे वितरण  विपणनबोरसुरी ग्रामपंचायतीमधील जमीन सुपीकता निर्देशांक याचे वाचन कृषि सहायकामार्फत शेतक-यांना समजावून सांगीतले.

मौजे चिंचोली येथील शेतकरी काशिनाथ मेहेत्रे यांची  कांदाचाळ पाहणी केली.मौजे निलंगा येथील शेतकरी गोविंद शिंगाडे यांचे 20 हे क्षेत्रावरील रुंद सरी वरंबा पध्दतीने सोयाबीन पेरणी केलेल्या क्षेत्राची पाहणी केली यावेळी उपस्थित तिन्ही मंडळ कृषि अधिकारी यांना मार्गदर्शन केलेमौ.ननंद येथे सचिन माधवराव पाटील यांचे 10 हे.क्षेत्रावरील रुंद सरी वरंबा पध्दतीने सोयाबीन पेरणी केलेले प्लॉटची पाहणी केलीभीमराव वैजनाथ पाटील यांनी पारंपारिक पाच फणी पेरणी यंत्राचा वापर करून मधला फण बंद करून सदरील बंद फणाच्या ठिकाणी नंतर सरी पाडण्याच्या तंत्राबदल कमी खर्चात केलेल्या पेरणी विषयी माहिती घेतलीमनरेगा अंतर्गत फळबाग लागवड केलेले शेतकरी यांच्यासोबत चर्चा केली.शेतकरी पटेल महताब यांनी स्वतः केलेले बहुपयोगी पावर टिलर खची करून त्याचे कौतुक केले.

             निलंगा तालूक्यातील शेती पिकांची माहिती मंडळ कृषि अधिकारी अनिल शेळके हणुमंत पाटील  रणजीत राठोड यांनी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी दिली..

****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या