प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पाणी आडवा पाणी जिरवा ही संकल्पना राबवावी-प्रगतशील शेतकरी धनराज बनसोडे




प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पाणी आडवा पाणी जिरवा ही संकल्पना राबवावी-प्रगतशील शेतकरी धनराज बनसोडे

औसा- तालुक्यातील प्रगतशील शेतकरी धनराज मारुती बनसोडे यांनी कोरोना या महामारीच्या काळात अन्नधान्य किट वाटप,  मास्क वाटप,सॅनिटायझर वाटप केल्यामुळे  यांच्या कार्याची दखल  घेऊन  महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई जिल्हा शाखा लातूर यांच्यावतीने लातूर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष  अशोक देडे  यांच्या हस्ते  सत्कार करण्यात आला. प्रगतशील शेतकरी व कोरोना योद्धा म्हणून गौरव पत्र, शाल,श्रीफळ सन्मान करण्यात आला.
     यावेळी बनसोडे म्हणाले की, पाणी आडवा पाणी जिरवा ही संकल्पना प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतात राबवल्यास यापासून नक्कीच फायदाच होतो. आज जगभरात कोरोना महामारी मुळे सर्वच परेशान आहेत यात शेतकरी तर जास्तच आहे पण शेतात माल नाही पिकला म्हणून शेतकरी आत्महत्या करतो हे मला मुळीच आवडत नाही. झालेल्या गोष्टीचा पश्चाताप न करता पुढे जाणे हे मी समजतो. माणूस हा चुकीचा पुतळा आहे, जो चुकतो तोच काळजी घेऊन दुसरे काम हाती घेतो. 1993 ला भूकंप झाला हाच माझ्या जीवनाचा टर्निंग पॉईंट आहे. मला भारतीय जैन संघटनेने हाताशी धरून लहानपणी पुण्याला नेले त्या ठिकाणी मी लहानाचा मोठा झालो त्यांचे संस्कार माझ्यावर झाले. जे चांगले तेच मी स्वीकारतो. आज पुण्यामध्ये माझी जडणघडण झाल्यामुळे पुणे हे माझे कर्मभूमी आहे,पण आशु हे माझी जन्मभूमी असल्यामुळे मी गावाकडे वळलो. पुणे या ठिकाणी शिपायाची नोकरी लागली असताना मला शेताकडे व व्यवसाय कडे ओढ असल्याने मी आज गावाकडे अठरा एकर शेती विकत घेऊ शकलो. आज माझ्या शेतात शंभर प्रकारचे वेगवेगळ्या जातीच्या फळांची मी लागवड केली आहे. शेतीला जोड धंदा म्हणून मी एका म्हशीवर दुधाचा व्यवसाय चालू केला.आज माझ्याकडे 22 म्हशी आहेत. भविष्यात शंभर ते दीडशे म्हशी करून या गावाचे मी नाव लौकिक करणार आहे. शेतकऱ्यांसाठी राज ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनी तयार करणार आहे. यामध्ये  शेती उपयोगी सर्व साधने मिळावीत हीच भावना आहे. माझ्या शेतामध्ये  शंभर बाय दीडशे फुटाचा खड्डा करून त्यात मी सेंद्रिय खत निर्मिती करत आहे. अत्याधुनिक गोठा तयार करताना यामध्ये मी म्हशीचे पाऊल निसटू नये म्हणून बसण्यासाठी  मॅट आणली आहे. काळजी म्हणून चारी बाजूने कॅमेरे व स्वच्छता राहावी म्हणून व्याक्युमने पाणी मारणे तसेच याठिकाणी मी दूध काढण्यासाठी 2 मशीनचा वापरही करत आहे. एका मशीनमध्ये 40 लिटर दूध संकलन होते.दिवसभर म्हशीला मुक्तसंचार करण्यासाठी मुक्त गोठा ही तयार केला आहे.  यामध्ये पाहिजे त्यावेळी खायला अन्न व पाण्याची सोय तसेच त्यांना बसण्यासाठी थंड ठिकाण ही तयार केले आहे. भविष्‍यात मत्स्यपालन व्यवसाय करण्याचाही मानस आहे. आज माझ्या शेतामध्ये 80 फूट खोल विहीर असून याद्वारे सर्व शेती भिजवली जाते, असेही ही शेवटी धनराज  बनसोडे म्हणाले.
    या सन्मान सोहळ्यात लातूर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक देडे, जिल्हा संघटक महादेव डोंबे,कोषाध्यक्ष अरुण जे कांबळे ,औसा तालुका अध्यक्ष असिफ पटेल,तालुका सचिव चंद्रकांत ढवन,औसा तालुका उपाध्यक्ष वैजनाथ कांबळे, औसा शहराध्यक्ष इलियास चौधरी,आदि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या