*ब्ल्यू बर्ड ज्युनिअर सायन्स कॉलेजचा निकाल 98.15 टक्के*
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्राुवारी/ मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या 12 वी विज्ञान शाखेमधील विद्याथ्र्यांच्या परीक्षेचा निकाल घोषीत झाला असुन तालुक्यातील श्री विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ आलमला अंतर्गत चालविण्यात येत असलेल्या ब्ल्यू बर्ड सायन्स कॉलेजने उज्वल यशाची परंपरा कायम ठेवत महाविद्यालयाचा निकाल 98.15 टक्के लागला आहे.
ब्ल्यू बर्ड सायन्स कॉलेज मधील सरस्वती बालाजी पिटले या विद्यार्थिनीने 80 टक्के गुण घेऊन महाविद्यालयातून प्रथम आली असून प्रज्ञा शांतवीर धाराशिवे 79.38 टक्के गुण घेऊन व्दितीय तर मोहिनी रमेश सुर्यवंशी 77.53 टक्के गुण घेऊन तृतीय आली आहे. महाविद्यालयातून 4 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले असून 31 विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत.
विद्याथ्र्यांची गुणात्मक विकासातून उच्च शिक्षणाची वाटचाल सुलभ व्हावी या दृष्टीकोनातून व विद्यार्थी हाच केंद्रबिंदु मानुन संस्था सर्वतोपरी प्रयत्नशिल असते त्यामुळे महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी यशस्वी होताना दिसत आहेत. महाविद्यालय हे ग्रामीण भागात असून येथील विद्याथ्र्यांना कुठल्याही प्रकारची शिकवणी लावलेली नसून महाविद्यालय स्तरावर विद्याथ्र्याची तयारी करून घेतली जाते. यातूनच हे विद्यार्थी यश संपादन करताना दिसत असून महाविद्यालयाच्या निकालाचा आलेख दरवर्षी 95 टक्केपेक्षा अधिक असून यावर्षी 98.15 टक्के लागला आहे. या यशस्वी विद्याथ्र्यांना प्रा. महारूद्र राख, प्रा. अमर केसरे, प्रा. योगेश माशाळकर, प्रा. यास्मीन फाजल, प्रा. हलीमा अरब, प्रा. सय्यद सर, प्रा. वैजनाथ घुटे या तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.
या सर्व यशस्वी विद्याथ्र्यांचे व प्राध्यापकांचे संस्थेच्या वतीने संस्था अध्यक्ष शिवचरण धाराशिवे, उपाध्यक्ष प्रभाकर कापसे, सचिव बसवराज धाराशिवे, सहसचिव महादेव खिचडे, विश्वेश्वरय्या पॉलिटेक्नीकचे प्राचार्य प्रशांत धाराशिवे, फार्मसीचे प्राचार्य विश्वेश्वर धाराशिवे, विश्वेश्वरय्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य गोपाळ दंडिमे, ब्ल्यू बर्ड सांयन्स कॉलेजचे व्यवस्थापक प्रा. प्रविण साबदे व प्राचार्या सौ. फिरदोस देशमुख, संस्थेचे सर्व संचालक मंडळ, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन व कौतुक केले.

0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.