जनावराचे बाजार बंद करू नका वंचितचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
लातूर प्रतिनिधी वंचित बहुजन आघाडी जिल्हा लातूरच्या वतीने जिल्हाध्यक्ष सय्यद सलीम यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. या निवेदनात असे म्हटले आहे की महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या दिनांक. २९/०४/२०२५. च्या पत्रकानुसार मुस्लिम बांधवांच्या भावनेशी खेळत, त्यांच्या विविध उत्सव दिनी विशेषता रमजान ईद, बकरी ईद देशभरात साजरी केली जात असताना प्रशासन धार्मिक भावना दुखावल्या जावा म्हणून जाचक परिपत्रक काढून, जनावराचे बाजारपेठ बंद, करण्याचे आदेश देऊन शेतकऱ्यांच्या व्यापारावर गदा आणण्याचे काम प्रशासन करत आहे.तशा जाचक अन्यायकारक पत्रकाचे अंमलबजावणी करण्यात येऊ नये त्या निषेधार्थ, आणि सर्व जनावराचे बाजार सुरळीत चालू ठेवून शेतकरी बांधवांच्या व्यापाराच्या समर्थनात धार्मिक उत्सव प्रक्रियेत त्यादिवशी शांतता सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातून लातूर जिल्हाधिकारी महोदय यांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष सय्यद सलीम, सचिव प्रा. प्रशांत उघाडे, महिला अध्यक्षा सुजाता ताई अजनिकर, शहर महासचिव आकाशजी इंगळे, शरीफ पठाण, लातूर तालुका अध्यक्ष सुनील भाऊ कांबळे, रेनापुर ता. माजी अध्यक्ष खय्युम शेख, उमर शेख, वाजिद शेख, खलील शेख सह पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
कलेक्टर महोदयांनी सदर अर्जाच्या बाबतीत गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.