अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांनी भविष्यात जिल्हाधिकारी होण्याची इच्छा शक्ती बाळगा.. संतोष सोमवंशी
औसा : मिल्लत ए अंजुमन ए महदविया औसा संस्थेच्या वतीने दहावी व बारावी परीक्षेत उच्च गुण मिळवणाऱ्या अल्पसंख्याक / मोमीन (महदविया) समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा हसिना उर्दू शाळेत मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले *महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाचे उपसभापती तथा शिवसेना जिल्हा प्रमुख संतोषभाऊ सोमवंशी* यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना सखोल प्रेरणा दिली.
"केवळ मार्क मिळवून थांबू नका, समाजासाठी योगदान द्या. तुम्हीही एक दिवस जिल्हाधिकारी व्हा – हीच माझी अपेक्षा आहे!"
त्या शब्दांनी अनेक पालकांच्या डोळ्यात अश्रू आले, आणि विद्यार्थ्यांच्या मनात नवीन स्वप्नं उगम पावली.
मरीय खुंदमिर तत्तापुरे – ९८% अबुजरअली म.हांजी अलुरे– ९७% शारिया उमर पंजेशा – ९५% नसिरा जहिर पटेल – ९३% अनम अकबर शेख – ९१% हुजैफ मुख़्तार बापुडे – ९१% मसिरा मुक्रम शेख ९०%
यांच्या सह अनेक इतर विद्यार्थ्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
आपल्या मेहनतीच्या जोरावर MBBS पूर्ण करणाऱ्या डॉ. शाहनवाज बब्बु मैंद यांचा विशेष सन्मान यावेळी करण्यात आला
कार्यक्रमास महिला जिल्हा संघटक सौ जयश्रीताई उटगे, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजू कसबे, मुस्लिम कबीर, राहुल गोरे, अंगद कांबळे, हमिदभाई सय्यद, सुरेशदादा भुरे, संजय उजळुंबे, डॉ. वहिद कुरेशी, जमादार सर, माजिदभाई काजी,एडवोकेट इकबाल शेख, एडवोकेट राहुल गोरे सलिम सर, प्रा. वाहब मल्लेभारी, डॉ. शाहनवाज मैंद, खुंदमिर तत्तापुरे अदी मान्यवर उपस्थित होते
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी
खुंदमिर मुल्ला मित्र मंडळ,खुनमीर मुल्ला शादाब हन्नुरे, नियामत अलुरे, गौस चौधरी, महेदी तत्तापुरे, अजिम अलुरे, कामरान हन्नुरे, जिशान सय्यद, आरबाज पठाण, मुक्रम शेख, दीपक कांबळे, इब्राहिम तत्तापुरे, मनोद्दिन तत्तापुरे, महम्मद मुल्ला यांनी परिश्रम घेतले
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.