*रस्त्यावर झोपलेल्या भिकाऱ्याला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला 24 तासाच्या आत अटक. औसा पोलिसाची कारवाई.*
औसा (प्रतिनिधी )याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक 4 मार्च 2025 च्या मध्यरात्री एका अज्ञात आरोपीकडून औसा शहरातील एका दुकानासमोर झोपलेल्या भिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. सदर घटनेमध्ये सदरचा भिकारी जळून गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर औसा व त्यानंतर लातूर येथील रुग्णालयात उपचार चालू असताना त्याने दिलेल्या फिर्यादीवरून 05 मार्च रोजी पोलीस ठाणे औसा येथे दिनांक गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, औसा कुमार चौधरी यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे औसा चे पोलीस निरीक्षक सुनील रेजीतवाड यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब नरवटे यांचे पथकाने गुन्ह्याचा अतिशय बारकाईने तपास करून गोपनीय माहिती मिळवून रस्त्यावर दुकानासमोर झोपलेल्या भिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळणार्या आरोपीला निष्पन्न केले असून त्याचे नाव
1)योगेश सिद्राम बुट्टे, वय 35 वर्ष, राहणार अन्नपूर्णा नगर, औसा.
असे असून त्यास दिनांक 7 मार्च 2025 रोजी त्याचे राहते ठिकाणाहून अटक करण्यात आली आहे.
भिकाऱ्याने आरोपीला शिवी दिल्याचा राग मनामध्ये धरून रात्री रोडवर झोपलेल्या भिकाऱ्याला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला असल्याचे कबूल केले आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनात औसा पोलिसांनी अतिशय कुशलतेने गुन्ह्याच्या तपास करून अज्ञात आरोपीला 24 तासाच्या आत निष्पन्न करून गुन्ह्यात अटक केली आहे.
सदरची कामगिरी वरिष्ठांचे व पोलीस निरीक्षक सुनील रेजीतवाड यांच्या मार्गदर्शनात पोलीस ठाणे औसा चे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब नरवटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महावीर जाधव, सहाय्यक फौजदार कांबळे, पोलीस अंमलदार गुट्टे, रतन शेख, समीर शेख, मुबाज सय्यद, बालाजी चव्हाण, पडीले,गोमारे यांनी केली आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.