तहुरा मजहरोद्दीन पटेल यांचा पहीला रोजा पूर्ण..
औसा शहरातील कुतुबशाही भागातील
तहुरा मजहरोद्दीन पटेल या 07 वर्षीय चिमुकल्याने पवित्र रमजान महिन्याचा त्याच्या जीवनातील पहिला रोजा आज दि.7 मार्च शुक्रवार रोजी पूर्ण केलाय. पहाटे पाच वाजेच्या सुमारास रोजा ठेवला व संध्याकाळी सहा वाजून 40 मिनिटांनी (उपवास) रोजा सोडला.तहुरा मजहरोद्दीन पटेल वय 07 वर्ष हे लातूर रिपोर्टर चे संपादक मजहरोद्दीन पटेल यांची ती मुलगी आहे.
रखरखत्या ऊन्हात काहीही न खाता व पाणी ही न पीता १३ तासाचा रोजा (उपवास) रमजान उल मुबारकमध्ये पूर्ण केल्या बद्दल पटेल परिवारात व तसेच परिसरातील नागरिकांनी या चिमुकल्यावर कौतुकाचा वर्षाव करत भरभरून आशीर्वाद दिलेत.अल्लाह या चिमुकल्यांची मनोबल वाढवो आणि त्यांचे उपवास स्वीकारो, आमीन.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.