शेख सलीम भाई का इन्तेकाल
औसा यहाँ के मशहूर शख्सियत इंडिया जनरल स्टोर के मालिक अब इस दुनिया मे नहीं रहे एक सड़क दुर्घटना मे मौत हो गई वे 45 वर्ष के थे
सब को हँसाने वाले अब सब को रुला कर चले गए
अल्लाह मरहूम की मगफिरत करे
तदफीन सनीचर सुबह 11 बजे लंगर पट्टी क़ब्रस्तान मे हुई
लातूर औसा राष्ट्रीय महामार्गावर आणखीन एकाचा बळी तर दुसरा जख्मी.
रस्त्यावर झालेल्या खड्ड्यांमुळे व धुळीच्या त्रासाने प्राणहानीच्या घटनेत वाढ..
महामार्गाचे काम संथगतीने करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई ची मागणी.
औसा प्रतिनिधी : - लातूर - औसा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वर रस्त्यावर झालेल्या खड्ड्यांमुळे धुळीच्या त्रासाने आणखीन एका दुचाकी वाहनधारकाचा औसा जवळील चंद्र लोक धाब्याजवळ बळी गेला आहे.तर अन्य एक जण गंभीर रित्या जख्मी झाल्याची घटना घडली आहे. याविषयी माहिती की, राष्ट्रीय महामार्ग क्र. 361 लातूर - औसा या रस्त्याच्या महामार्गावर रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूने रस्ता खोदल्याने रहदारीच्या या महामार्गावर जागोजागी खड्डे पडल्यामुळे तसेच रस्त्यावर जाणाऱ्या व येणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहनधारकांना धुळीचा त्रास होत असल्यामुळे हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला असून या महामार्गाचे काम संथगतीने व निकृष्ट दर्जाचे होत असून या महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी दुचाकी व चारचाकी वाहनधारकांकडून केली जात आहे. राष्ट्रीय महामार्ग वरील औसा जवळील चंद्रलोक धाब्याजवळ दि. 12 नोव्हेंबर 2021 रोजी शुक्रवारी रात्रीच्या सुमारास लातूरहून औशाकडे येणारे सलीम सत्तार शेख (वय 45 रा. कालन गल्ली औसा) यांच्या दुचाकी वाहनास अपघात झाल्याने त्यांत त्यांचा मृत्यू झाला आहे. तर त्यांच्या सोबत असलेला मुलगा मुजम्मिल सलीम शेख (वय 10 वर्ष रा.कालन गल्ली औसा) हा जखमी झाला असून त्यांस उपचारासाठी शासकीय रुग्णालय लातूर येथे दाखल करण्यात आले आहे. या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत चालत असून उर्वरित तपास औसा पोलीस ठाणे करीत आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.