श्रावणमास अनुष्ठान सोहळा कोरोनामुळे रद्द
औसा मुख्तार मणियार
कोरोना व लॉकडाऊनच्या पाश्र्वभूमीवर औसा येथील श्री वीरनाथ मल्लनाथ महाराज संस्थानच्या वतीने दरवर्षी होणारा श्रावणमास अनुष्ठान सोहळा यावर्षी रद्द करण्याचा निर्णय संस्थानने घेतल्याची माहिती पिठाधिपती सद्गुरू गुरुबाबा महाराज व नाथ सेवा मंडळाचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी शुक्रवारी दिली आहे.संस्थानचे सर्व शिष्यगण, भाविक भक्त गणांनी यंदा आपल्या घरीच नित्यसेवा,गाथा पारायण,ज्ञानेश्वरी पारायण,चकरीभजन करावे,असे संस्थानच्या वतीने सांगण्यात आले.श्रावणमासामध्ये नाथ मंदिरातील समाधीची पूजा,चकरीभजन व अनुष्ठानातील सर्व नित्योपचार स्वत: सद्गुरू गुरुबाबा महाराज हे करणार आहेत.लॉकडाउनमुळे सध्या नाथ मंदिर बंद असल्यामुळे कोणीही दर्शनासाठी येऊ नये,शासन नियमांचे पालन करावे, असे आवाहन सद्गुरू गुरुबाबा महाराज व गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.