कार आणि मोटरसायकल अपघातात एक ठार एक गंभीर

 कार आणि मोटरसायकल अपघातात एक ठार एक गंभीर 

औसा प्रतिनिधी  शिवाजी मोरे








तालुक्यातील चलबुर्गा पाटील नजीक असलेल्या पेट्रोल पंपाजवळ भरधाव येणाऱ्या कार ने मोटरसायकल ला धडक दिल्यामुळे मोटरसायकल वरील शिवकुमार अशोक कांबळे वय 22वर्ष राहणार पान चिंचोली तालुका निलंगा हा युवक जागेच ठार झाला असून आणि एक जण गंभीर जखमी झाल्याने त्यास उपचारासाठी लातूरला हलविण्यात आल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे याबाबतची सविस्तर माहिती अशी की दिनांक 11 जानेवारी रोजी 7:30 वाजण्याच्या सुमारास मोटरसायकल क्रमांक एम एच 24 14 19 या दुचाकी वरून लातूर कडे जात असताना एम एच 14 पी एस 69 99 या भरधाव वेगाने येणाऱ्या कारणे मोटरसायकलला जोराची धडक दिल्यामुळे मोटरसायकली वरील पान चिंचोली येथील युवक जागीच ठार झाला असून अन्य एकास उपचारासाठी लातूरला हलविण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे कळते





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या