लहान हातांनी केले मोठे योगदान. खाऊसाठी दिलेले पैसे मस्जिद साठी केले दान. चिमुकल्या कडुन परोपकाराचा सुंदर संदेश.

 लहान हातांनी केले मोठे योगदान.


खाऊसाठी दिलेले पैसे  मस्जिद साठी केले दान.


चिमुकल्या कडुन परोपकाराचा सुंदर संदेश.




बी जी शेख 


  औसा.देशात रमजान महिना मोठ्या उत्साहात साजरा होत असतो.रमजान महिन्याच्या आगमनाने, उपासना, दया आणि चांगुलपणाचे वातावरण तयार होते. दरवर्षी प्रमाणे यावर्षी पवित्र महिन्यात,ऑर्बिट प्री-प्रायमरी इंग्लिश स्कूलने मुलांमध्ये दान आणि सहानुभूतीची भावना विकसित करण्यासाठी "सदका बॉक्स"उपक्रमाचे आयोजन केले.लहान मुलांनी आपल्या अल्प बचतीतून यात हातभार लावला.यात चिमुकल्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. कुणी खिशात पैसे दिले, तर कुणी आपली आवडती वस्तू सोडून चांगुलपणाचा मार्ग निवडला.या निष्पाप हातांनी हे सिद्ध केले की चांगुलपणाची सुरुवात छोटी असली तरी त्याचा प्रभाव मोठा असतो.जमा झालेल्या धर्मादाय रकमेचा उपयोग गरजूंना मदत करण्यासाठी केला जाईल.



     योगायोग असा की शाळेसमोर नबी मशिदीचे बांधकाम सुरू आहे. प्रत्येकजण मशिदीच्या बांधकामाला परोपकाराचे उत्कृष्ट साधन मानतो.या उदात्त कार्यात मुलांना हातभार लावण्याचे आवाहन करण्यात आले. मुलांनी हे आवाहन मनापासून स्वीकारले आणि अवघ्या एका आठवड्यात रु. १०६७०/- जमा केले. आज शुक्रवारच्या नमाजपूर्वी ही रक्कम मस्जिद कमिटीचे अध्यक्ष हाजी सुलतानसाब बागवान आणि इमाम मौलाना फिरोजसाब इशाती यांना सन्मानपूर्वक सुपूर्द करण्यात आली. यावेळी सर्वांनी मुलांच्या भावविश्वाचे कौतुक करून त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी या लहान चिमुकल्यांसाठी प्रार्थना केली.खरोखर, हा उपक्रम केवळ आर्थिक मदत म्हणून नव्हे तर मुलांच्या हृदयात माणुसकी, दयाळूपणा आणि समाजसेवेची बीजे पेरण्याचा एक सुंदर प्रयत्न मुलांनी केला.अल्लाह या छोट्या हातांच्या या महान कृपेचा स्वीकार करो आणि त्यांना भविष्यातही असे उदात्त कार्य करण्याची क्षमता देत राहो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या