औसा येथे आज जलसा-ए-सिरतुन्नबीचे आयोजन



औसा येथे आज जलसा-ए-सिरतुन्नबीचे आयोजन



औसा : पैगंबर-ए-इस्लाम हजरत मुहम्मद मुस्तफा ﷺ यांच्या पवित्र जीवनचरित्र व शिकवणीचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी औसा शहरातील मस्जिद-ए-हाशमी, हाशमी चौक येथे आज, गुरुवार, १० सप्टेंबर २०२६ रोजी जलसा-ए-सिरतुन्नबीचे आयोजन करण्यात आले आहे.

जलशाची सुरुवात मगरिबच्या नमाजीनंतर सायंकाळी ७ वाजता होणार आहे. हैदराबाद येथील हजरत मौलाना मुहम्मद अब्दुल कवी साहब यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार असून, हजरत मौलाना याह्या साहब नोमानी हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

यावेळी सीरतुन्नबी, पैगंबर-ए-इस्लाम यांच्या जीवनातील आदर्श, मानवता, बंधुभाव, शांतता आणि सामाजिक सद्भावनेचा संदेश उपस्थितांना देण्यात येणार आहे.

या धार्मिक कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन मजलीसे उलेमा व जमीयत उलेमा, ता. औसा यांच्या वतीने करण्यात आले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या