लातुर जिल्हात लॉकडाऊन च्या दुस-या टप्प्यात थोडी शिथिलता



लातुर जिल्हात लॉकडाऊन च्या दुस-या टप्प्यात शिथिलता
औसा मुख्तार मणियार
लातूर जिल्ह्यातील कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर १५ जुलै ते ३० जुलै च्या  काळात जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी लॉकडाऊन जाहीर केले असून १५ जुलै ते २० जुलै हा पहिला टप्पयात कडक संचारबंदी लागू केली होती.या अनुषंगाने दि २१ जुलै २०२०मंगळवार पासून दुस-या टप्प्यात लॉकडाऊन मध्ये काय शिथिल केले जाणार आहे.याची माहिती अशी दि.२१जुलै मंगळवार पासून किराणा दुकाने, भाजीपालाची दुकाने सकाळी ७ वाजल्यापासून ते दुपारी १२ वाजेपर्यंत सुरू असणार आहेत.आणि सर्वच मॉल्स (विश्व डी मार्ट) चालु असतील परंतु त्यांना दुकांनात विकता येणार नाही त्यांना घरपोच सेवा दिली जाईल.अत्यावश्यकमध्ये दवाखाने, मेडीकल दुकाने ही चालू राहणार आहेत. हे सोळून बाकी सगळी दुकाने बंद राहणार आहेत. नागरिकांनी भाजीपाला किंवा किराणा व राशन घेण्यासाठी जात असताना आपण कोणतेही दोन चाकी व तीन चाकी,व चार चाकी वाहन घेऊन जाता येणार नाही.काहीही अत्यावश्यक वस्तू आणायला चालतच जावे लागणार आहे.वाहन घेऊन गेल्यास त्यांच्यावर कडक कार्यवाही केली जाणार आहे.घराबाहेर पडताना आपण मास्क लावून व शक्य तो छत्री सोबत घेऊन निघावे कारण पावसामध्ये आपली सुरक्षा होईल व जेने करुन सोशल डिस्टंसिगचे नियम पाळले जाईल.अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या