अबब चक्क अर्धनग्न होऊन केले आंदोलन.
तयार केलेल्या पुला जवळील रस्ता पक्का करून देण्यासाठी भादेकरांचे अजब आंदोलन.
शेख बी जी.
औसा.दि.8 तालुक्यातील मौजे भादा येथे मागील वर्षी अरुंद पूल असल्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत होत्या. जोराचा पाऊस झाला तर या ठिकाणी अनेक वाहने व लहान शाळकरी मुलांना त्रास होत होता याकडे पाहून येथील नागरिकांनी वेळोवेळी मागणी केल्यामुळे पुलाची मंजुरी मिळाली तब्बल 4: 25 कोटी रुपये खर्च करून पूल बांधण्यात आला. परंतु पूल बांधण्यासाठी बाजूला खोदण्यात आलेल्या रस्त्याला पक्का करून देण्यासाठी संबंधित गुत्तेदार टाळाटाळ करत असल्यामुळे स्थानिक युवकांनी संबंधित अधिकाऱ्याला पत्राद्वारे निवेदन देऊन विशिष्ट कालावधीत फुलाजवळील रस्ता पक्का नाही करून दिला तर आम्ही अर्धनग्न होऊन आंदोलन करू दिलेला वेळ संपल्यानंतर गावातील युवकांनी आज दिनांक आठ वार सोमवार रोजी सकाळी दहा वाजता मुख्य चौकातून व ग्रामपंचायतच्या कार्यालयापासून आंदोलनाला सुरुवात केली व अर्ध नग्न होऊन ते गावातील चौकापासून संबंधित पुलापर्यंत पोहोचले. पुलावर जाऊन अर्धनग्न होऊन रस्ता रोको आंदोलन केले.यावेळी बांधकाम विभागाचे अधिकारी या ठिकाणी येऊन यांना लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन थांबवण्यात आले. यावेळी त्यांनी पत्रात असे नमूद केले आहे की झालेला पूल हा संबंधित गुत्तेदार पुढील काम करत नसल्यामुळे रस्ता होत नाही. संबंधित गुत्तेदाराला तशा पद्धतीचे आदेश देण्यात आले आहेत.आठ दिवसात हा रस्ता पूर्ण केला जाईल तेव्हा कुठे गावातील युवकांनी आपले रस्ता रोको आंदोलन मागे घेतले. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लेखी पत्र दिल्यानंतरच येथील आंदोलन थांबवण्यात आले.
तब्बल एक ते दीड तास आंदोलन सुरू होते.यावेळी अनेक वाहने या ठिकाणी थांबलेली दिसून आली. याच पुलावरून अनेक गावांचा संपर्क असल्याने वाहने थांबल्याने अनेकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागला.पुढील काळात अशी समस्या निर्माण होऊ नये म्हणून संबंधित अधिकाऱ्यांनी व गुत्तेदारांनी ताबडतोब लक्ष देऊन हा रस्ता पूर्ण करण्यासाठी लक्ष द्यावे अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन केले जाईल. असा इशाराही यावेळी येथील लोकांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.