मुस्लीम समाजाला आरक्षण देण्यासाठी अधिवेशनात प्रश्न मांडण्याची एम आय एम ची मागणी


मुस्लीम समाजाला आरक्षण देण्यासाठी अधिवेशनात प्रश्न मांडण्याची एम आय एम ची मागणी




शेख बी जी.


औसा .दि 8 अल्पसंख्यांक मुस्लीम समाजाला आरक्षण देण्यात यावे तसेच महाराष्ट्र राज्यातील अल्पसंख्यांक समाज अद्याप मागसलेपणामुळे विकासापासुन दुर आहे. समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक विकासाच्या विविध योजनांची माहिती समाजापर्यंत पोहंचत नसल्याने विकासाच्या योजना पासुन समाजाला वंचित ठेवण्यात येत आहे. ज्यामुळे मुस्लिम समाज सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या मागास पडत आहे.आज दि.8 वार सोमवार रोजी तहसीलदार यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली.

विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून अल्पसंख्यांक सर्वांगिण विकासाकरिता महाराष्ट्र राज्यात अल्पसंख्यांक आयोगाचे गठण त्वरीत करण्यात यावे. तसेच जिल्हानिहाय व तालुकानिहाय स्वतंत्र अल्पसंख्यांक समितीची गठीत करण्याचे आदेश त्वरीत देण्यात यावेत. मुस्लिम समाजास शैक्षणिक, व्यवसायिक, शासकिय सेवेत १०% आरक्षण त्वरीत मंजुर

करुन लागु करण्यात यावे.

तालुकास्तरावर तहसीलदार यांना सर्व विभागाकडून अल्पसंख्यांक विकासाच्या शासकीय योजना राबविण्यात येत असलेल्या व राबविल्याचे बुकलेट प्रकाशित करावे.

आदी मागण्यांची निवेदन देण्यात आले निवेदनावर स्थानिक मुस्लिम एम आय एम चे मुजफ्फर आली इनामदार तुराब पठाण सईद शेख जुल्फीखार शेख आदींच्या  स्वाक्षर्‍या आहेत.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या