औसा - लातूर राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीस्वारास ट्रकने चिरडले...
शेख बी जी
औसा : दि.8 औसा - लातूर राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीवरून जात असताना पाठीमागून गॅस सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला जोरदार धडक देत चिरडल्याची घटना औसा - लातूर महामार्गावरील आलमला मोडवर दि. ०७ जूलै २०२४ रविवारी रोजी रात्री ०८ : ४५ वाजता घडली. यामध्ये दुचाकी चालक जागीच ठार झाला असून, दुचाकीसह जवळपास ५०० फूट फरफटत नेले. त्यामुळे दुचाकीवरील व्यक्तीच्या शरीराचे कमरेपासून दोन तुकडे झाले असून, छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह गोळा करून ग्रामीण रुग्णालय औसा येथे आणण्यात आला. दरम्यान, पोलिसांनी ट्रकचालकासह ट्रक ताब्यात घेतली असून राम पांडुरंग शिंदे (वय ५८) रा. बोधे नगर, लातूर असे मयताचे नाव आहे.
पोलिसांनी सांगितले, राम शिंदे हे औसा तालुक्यातील बोरफळ येथील पाहुण्यांना भेटण्यासाठी रविवारी गेले होते. दरम्यान, पाहुण्यांना भेटून ते पुन्हा रात्री ८:१५ वाजण्याच्या सुमारास लातुरातील घराकडे दुचाकीवरुन (एम.एच. २४ ए.क्यू, २१११) निघाले होते. दरम्यान, औसा - लातूर राष्ट्रीय महामार्गावरील आलमला मोडवर गॅस टाक्यांची उदगीरकडे वाहतूक करणाऱ्या ट्रकने (एम.एच. २४ ए.यू. २५३७) दुचाकीला चिरडले. यात दुचाकीचालकाचा जागीच मृत्यू झाला. रात्री उशिरापर्यंत याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. अपघातानंतर दुचाकीस्वाराचा मृतदेह भर रस्त्यातच छिन्नविछिन्न अवस्थेत पडल्याने बराचवेळ या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, या मृतदेहाची लवकर ओळख पटली नाही. दरम्यान, त्याच्याजवळ सापडलेल्या कागदपत्रावरून त्याची ओळख पटली असून, राम पांडुरंग शिंदे, रा. बोधेनगर लातूर असे या मृत व्यक्तीचे नाव आहे.
अपघातात जवळपास ५०० फुटापर्यंत दुचाकी फरफटत गेली. घटनास्थळी औसा पोलिसांनी भेट देऊन ट्रक ताब्यात घेतला आहे. याबाबत औसा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. दरम्यान, याची माहिती औसा पोलिसांना मिळताच पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले.
चार दिवसातील हा दुसरा अपघात मागील चार दिवसात आलमला मोडवर झालेला हा दुसरा अपघात आहे. बुधवारी याच ठिकाणी महामंडळाची एसटी खड्ड्यात गेल्याची घटना घडली होती. ती आज रात्री दुचाकीस्वारला चिरडल्याची घटना घडली आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.