मुख्यमंत्री वयोश्री योजनेमुळे ज्येष्ठांना मिळणार आधार ! · जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन

 

मुख्यमंत्री वयोश्री योजनेमुळे ज्येष्ठांना मिळणार आधार !

·         जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन







लातूरदि. 08 (प्रतिनिधी ) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत जेष्ठ नागरीकांसाठी ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ सुरु करण्यात आली आहे.  या योजनेंतर्गत 65 वर्षे व त्यावरील जेष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांच्या वयोमानपरत्वे येणाऱ्या दिव्यांगत्वअशक्तपणा यावर उपायोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने व उपकरणे  खरेदी करण्यासाठी, तसेच मन:स्वास्थ केंद्र योगोपचार केंद्राद्वारे मानसिक स्वास्थ्य  अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणासाठी एकवेळ एकरकमी 3 हजार रुपये इतकी रक्कम पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात डीबीटी प्रणालीद्वारे थेट लाभ वितरण केले जाणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे.

मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारचे छायाचित्र, ओळखीचा पुरावा (मतदार ओळखपत्र किंवा पारपत्र किंवा वाहन चालक परवाना), पत्त्याचा पुरावा (शिधापत्रिका किंवा सातबारा आणि 8 अ चा उतारा किंवा वीज देयकाची छायांकित प्रत), वयाचा पुरावा (जन्म दाखला किंवा शाळा सेाडल्याचा दाखला किंवा इतर पुरावा), आधार कार्डची छायांकित प्रत, राष्ट्रीयकृत बँक पासबुक किंवा कॅन्सल चेकची छायांकित प्रत, उत्पनाचे प्रमाणपत्र अथवा स्वयंघेाषणापत्र, शासनाच्या इतर योजनेमधून लाभ घेतला नसल्याचे स्वयंघोषणापत्र, इतर स्वयंघोषणापत्र, ओळख पटविण्यासाठी अन्य कागदपत्रे पॅनकार्ड अथवा इतर पेन्शन योजनेचे ओळखपत्र सादर करावे.

लातूर जिल्ह्यात ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी कृती आराखडा तयार केला असून ग्रामीण स्तरावर लातूर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), तर शहरी भागात लातूर महानगरपालिका उपायुक्त आणि नगरपालिका प्रशासनचे जिल्हा सहआयुक्त यांना नोडल अधिकारी नेमण्यात आलेले आहे. नोडल अधिकारी यांनी जेष्ठ नागरिकांच्या आरोग्य तापासणी शिबिरांसाठी ग्रामपंचायत, शहरीस्तरावर प्राथमिक आरोग्य केंद्रातील  अधिकारी, कर्मचारीग्रामसेवकआशा वर्कर तसेच महानगरपालिकेतील आरोग्य कर्मचारी व वसुली निरीक्षक यांची समिती स्थापन करून संबंधित अधिकारी-कर्मचारी यांनी जेष्ठ नागरीकांचे घरोघरी जावून सर्वेक्षण व स्क्रिनिंग करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे पात्र लाभार्थ्यांचे अर्ज संकलित करून सहाय्यक आयुक्तसमाज कल्याण, लातूर या कार्यालयाकडे जमा करावेत. जेष्ठ नागरिकांनी या योजनेसाठी सहाय्यक आयुक्तसमाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी केले आहे.

*****


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या