भेटा येथील युवकाचे मोटरसायकल अपघातात मृत्यू तर पत्नी व मुलांची प्रकृती चिंताजनक.

 भेटा येथील युवकाचे मोटरसायकल अपघातात मृत्यू तर पत्नी व मुलांची प्रकृती चिंताजनक.





शेख बी जी


औसा.दि.10 भादा औसा रोडवर आज दुपारच्या वेळेस मोजे भेटा येथील एका युवकाचा मोटरसायकल वरून जाताना   बऱ्हाणपूर ते हळदुर्ग दरम्यान अपघात घडला. समोरून येणाऱ्या लोडिंग वाहनाची जोरदार धडक बसल्याने सलीम शेख वय 35 वर्ष याचा जागीच मृत्यू झाला.

प्रथम उपचारासाठी म्हणून नागरिकांनी औश्यातील रुग्णालयात दाखल केले. तपासणी केली असता येथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.  पंचनामा करून घेऊ असे भादा येथील पोलीसांनी नातेवाइकांना सांगितले.तो पर्यंत तुम्ही पी.एम करून अंत्यविधी करून घ्या असे कळविले आहे.

सलीम शेख यांच्यासोबत त्यांची पत्नी व दोन मुले गाडीवर होते  या अपघातात त्यांच्या पत्नीचा पाय तुटला असून दोन्ही मुलं जखमी झाले आहेत. यांना उपचारासाठी लातूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.पत्नी व मुलांची प्रकृती चिंताजनक असल्याची त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले  आहे.

रात्री उशिरा अंत्यविधी भेटा येथील कब्रस्तानात करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या