आदर्श आचारसंहितेचा भंग केल्यास होणार कारवाई · विना परवानगी मिरवणूक काढणे, बॅनर लावण्यास

 आदर्श आचारसंहितेचा भंग केल्यास होणार कारवाई

·       विना परवानगी मिरवणूक काढणे, बॅनर लावण्यास मनाई




लातूरदि. 03 (प्रतिनिधी ) : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता जिल्ह्यात लागू असून या आदर्श आचारसंहितेचे भंग केल्यास संबंधितांवर कडक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. आदर्श आचारसंहिता काळात विना परवानगी मिरवणूक काढणे, बॅनर किंवा पोस्टर लावण्यास मनाई असून या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमानुसार लातूर लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी 4 जून 2024 रोजी होणार आहे. या दिवशी विना परवानगी मिरवणूक काढणे, बॅनर किंवा पोस्टर लावण्यासारखी कृती केल्यास तो आदर्श आचारसंहितेचा भंग समजण्यात येणार असून भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे. त्याबाबतच्या सूचना पोलीस प्रशासनाला देण्यात आल्या असून अशा प्रकारे उल्लंघन झाल्यास पोलिसांमार्फत तातडीने कार्यवाही केली जाणार आहे.

मतमोजणी केंद्राच्या 200 मीटर परिसरात 4 जून 2024 रोजी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे मतमोजणी केंद्राच्या ठिकाणापासून 200 मीटरच्या परिसरामध्ये मंडपेदुकाने उभारणेतसेच मोबाईल फोनकॉर्डलेस फोनपेजरवायरलेस सेटध्वनिक्षेपक व इतर सेटध्वनिक्षेपक व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे बाळगण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. तसेच निवडणूकीच्या कामाव्यतिरिक्त खाजगी वाहनसंबंधित पक्षाचे चिन्हाचे प्रदर्शन व निवडणूकीच्या कामा व्यक्तीरिक्त व्यक्तीस प्रवेश करण्यासाठी प्रतिबंध करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या