एका मुसलमानास अखेरचा निरोप देतांना...
राजू पाटील संपादक दैनिक मनोगत
----- ------------ ------- --------- ------ ---------
कालचा दिवस आमच्या परिवारासाठी अत्यंत दुःखद गेला .काल आम्ही आमच्या चाच्यांना अखेरचा निरोप दिला.प्रत्यक्ष अंत्यविधीला हजर न राहता , आम्ही अल्हाकडे चाचांच्या चीरशांती साठी प्रार्थना केली . चाचा गेले , ही बातमी जेंव्हा आमच्या परिवारात परिवारात पसरली , तेंव्हा परिवारातले छोटे सदस्य धायमोकलून रडू लागले.रडणारच , कारण ते चाच्यांच्या अंगाखांद्यावर खेळून मोठे झाले होते.पाटील आणि राचट्टे परिवारात चाचांचा वावर घरच्या सदस्या सारखाच होता.दोन्ही परिवारातल्या प्रत्यक्ष गोड कडू प्रसंगात चाचा अग्रस्थानी असायचे.राचट्टे परिवारातील हणमंत , निशांत , दर्शन , आणि रानुताई व माझ्या परिवारातील प्रणव ,अमित आणि प्रणिता , चाचांची सदैव वाट पहात असत.कारण चाचा या छोट्यांना , सलामवालेकूम म्हणतं आणि एका विशिष्ट स्टाईल मध्ये आपला उजवा हात कपाळाला लावत असत.या कृतीचे छोट्यांना खूप अप्रुप वाटायचे .शिवाय चाचा सर्वांना सायकल वरुन चक्कर मारुन आणत असत.50 पैशाची पेप्सी किंवा खारमुरीही चाचा कडून छोट्या मुलांना मिळत असे.डोक्यावर काळी किंवा पांढरी टोपी , कुर्ता पायजमा आणि सायकल ही चाचांची ओळख .
चाचा मुसलमान होते , त्यांच्या मुसलमान असण्याचाही आम्हाला नेहमी गर्व असायचा.कारण एक मुसलमान किती नेक असतो , पाक असतो , इमानदार असतो , संहिष्णु असतो , हे आम्हाला चाचा कडून पहायला मिळाले होते.चाचा कडून आम्ही निष्ठा शिकलो.चाचा 1993 ला मनोगत मध्ये रुजू झाले.आणि शेवट पर्यंत मनोगतचेच राहीले.चाचा जुन्या काळातली ट्रेडल छपाई मशीन चालवायचे , त्या नंतर सलेंडर मशीन आले , त्यावरही चाचा महिनाभरात स्वार झाले.पुढे आँफसेट आले , तेही चाच्यांनी तीन चार महिन्यात शिकून घेतले.प्रिंटिंग प्रेस मधील सर्व कामे चाचांना उत्तम अवगत होती.कंपोज , पेजिंग , छपाई , बांईडिंग ,कटिंग वगैरे.चाचांनी फक्त संगणकासमोर हात टेकले होते.कारण चाचा फक्त चवथी पास होते.चाचांचा परिवारही खूप मोठा होता.दिनशाम बाडा हे चाच्यांचे निवास स्थान.या वाड्याच्या अनेक कथा चाचा आम्हाला सांगायचे .चाचा माझ्या लेखनीचे खूप चहाते होते.छपाई , वितरण झाल्या नंतर चाचा रोज न चुकता अग्रलेख , रिंगण वाचायचे आणि मला आवर्जून प्रतिक्रियाही द्यायचे .चाचा माझ्या प्रेमापोटी माझी तुलना मोठ मोठ्या लेखकांशी करायचे.तो त्यांच्या मनाचा मोठेपणा असायचा.मनोगतच्या प्रत्येक चळवळीत चाचाच पुढे असायचे.मनोगत कला महोत्सवाची धावपळ तर चाचा शिवाय पार पडायचीच नाही.आमचे मोठे बंधू तिपण्णप्पा राचट्टे दादा आणि मी , ही चाचांची खास श्रद्धास्थळे. चाचांचे अपार प्रेम होते आम्ही दोघांवर आणि आमचे चाचावर.चाचा गेल्याच वर्षी साठ वर्षाचे झाले.आम्ही त्यांना निवृत्तीचा सल्ला दिला , पण चाचांनी तो मानला नाही.हातपैर चलते तब तक काम करना पडता है , म्हणतं चाचा कामातच राहीले.
लाँकडाऊन मुळे मनोगत कार्यालय गेल्या तीन महिन्या पासून आम्ही बंद ठेवले आहे.चाचांची भेट रमजान इद दिवशी झाली.दरवर्षी प्रणाणे चाचा , इदचा शिरर्कुमा , भजी गुलगुले घेऊन घरी आले होते.ही चाचांची अखेरची भेट ठरली.
चाचा मुसलमान होते , असे आम्ही म्हटले .त्याचे कारण चाचांच्या प्रेम , इमानदारी आणि निष्ठा , या ञिगूणा मुळे.आज आम्ही एका जुन्या सहकार्याला कायमचे मुकलो आहोत.खूप जड अंतःकरणाने , डोळे बंद करुन अखेरचा निरोप दिलाय आम्ही आमच्या चाचांना.अर्थात नईमोद्दीन रहिमोद्दीन शेख यांना .
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.