*घरफोडीच्या गुन्ह्यातील 2 आरोपींना, 2 लाख रुपयाच्या मुद्देमालासह अटक. वरिष्ठाचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.*


   याबाबत थोडक्यात माहिती की, पोलीस ठाणे एमआयडीसी हद्दी मध्ये राहते बंद घराचा कुलूप तोडून चोरीची घटना घडली होती. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून पोलीस एमआयडीसी गु.र.नं 945/2023 कलम 454,380 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.

              सदरचा गुन्हा उघडकीस आणणे बाबत पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी आदेशित केले होते. त्यावरून पोलीस अधीक्षक सोमय मुंडे ,अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अमलदारांचे पथके तयार करून त्यांना सखोल मार्गदर्शन व सूचना देण्यात आल्या होत्या. 

             सदर पथकाकडून गुन्ह्या संदर्भात बारकाईने तपास सुरू असताना मोठ्या प्रमाणात बातमीदार नेमून तसेच तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेण्यात येत होते.

                 वरिष्ठांचे मार्गदर्शनात सदरच्या पथकांनी केलेल्या परिश्रमामुळे पथकांना गुप्त बातमीदाराकडून घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या आरोपींची माहिती मिळाली.

                      सदर माहितीची बारकाईने अभ्यास व विश्लेषण करून बंद घराचे कुलूप तोडून  चोरी करणारे आरोपींना निष्पन्न करून त्यांच्या राहते ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आले आहे.

                     सदर पथकांनी अतिशय कुशलतेने व उत्कृष्टपणे नमूद गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन आरोपी नामे


1) शंभू विक्रम बुधवाडे, वय 22 वर्ष, राहणार पिंटू हॉटेलचे पाठीमागे,मळवटी रोड, लातूर.


2) आकाश उर्फ भावड्या बाबुराव कांबळे, वय 24 वर्ष, राहणार सिद्धेश्वर नगर, मळवटी रोड, लातूर.

                 यांना दिनांक  08/01/2024 रोजी त्यांचे राहते ठिकाणाहून ताब्यात घेवुन चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या आणखीन एक साथीदारासह मिळून सदर गुन्हा केल्याचे कबुल केले. त्यांनी वर नमुद गुन्ह्यात  चोरलेला मुद्देमाल पैकी 40 ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने एकूण 2 लाख रुपयाचा मुद्देमाल हजर केल्याने वरील आरोपींना वर नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आलेली असून गुन्ह्यातील आणखीन एक फरार आरोपीचा शोध सुरू आहे.

               गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे एमआयडीसी हे करीत आहेत.

               वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस पथकांनी अतिशय उत्कृष्टरित्या तपास करून बंद घराचे कुलूप तोडून मुद्देमाल चोरणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

                   सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वातील पथकामधील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण राठोड, पोलीस अमलदार रियाज सौदागर, योगेश गायकवाड, राजेश कंचे, प्रदीप स्वामी, प्रदीप चोपणे, यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या