पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी
औसा प्रतिनिधी
औसा येथील होळकर प्रतिष्ठान व सार्वजनिक जयंती समितीच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्जी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली शनिवार दिनांक 31 मे रोजी सकाळी 8 वाजता आ. अभिमान्यू पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण व पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यात आले पारंपारिक धनगरी ढोल वाद्याच्या गजरात येळकोट येळकोट जय मल्हार चा जयघोष करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी तहसीलदार घनश्याम अडसूळ हे होते.औसा शहरात महापुरुषांच्या जयंती कार्यक्रमांमध्ये सर्व जाती धर्माचे लोक अत्यंत उत्साहाने सहभागी होतात होळकर प्रतिष्ठानच्या वतीने सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.यावेळी बोलताना आ अभिमन्यू पवार यांनी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी 28 वर्ष आदर्श राज्य कारभार करीत गुन्हा केल्यानंतर स्वतःच्या मुलालाही शिक्षा देऊन आपले आदर्श न्यायदान सिद्ध केले.त्यांच्या कार्याचा आदर्श संपूर्ण मानव जातीसाठी प्रेरणादायी असून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत देव देश आणि धर्म रक्षणासाठी केलेल्या कार्याला उजाळा दिला.यावेळी वीरसेव समाजाचे अध्यक्ष सुभाषप्पा मुक्ता सुभाष जाधव,प्रदीप मोरे, सचिन माळी,अशोक कुंभार,संतोष वर्मा, पप्पू गवळी,एल टी चव्हाण,सौ कल्पना डांगे,संतोष माने,युवराज चव्हाण ,लिंबराज जाधव ,सुनीलप्पा उटगे,शिवरुद्र मुर्गे,धनंजय परसाने ,संभाजी शिंदे,आत्माराम मिरकले ,किशन कोलते, गोपाळ धानोरे गोविंद जाधव यांच्यासह सर्व जाती धर्माचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आर्यन कोद्रे आणि सायली कांबळे या विद्यार्थ्यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त जयंती समितीच्या कार्यकर्त्यांनी उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल आ अभिमन्यू पवार यांच्या हस्ते जयंती समितीच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वश्री बाळासाहेब कांबळे,प्रकाश कांबळे,दगडू कांबळे,सूर्यभान कांबळे,अर्जुन गाडेकर,भरत कांबळे, महेश कांबळे,दत्ता कांबळे,भगवान गाडेकर,राम बनसोडे,भागवत कांबळे,गोविंद कांबळे,किरण डपाळ,विश्वनाथ कांबळे,राजेश सलगर, महादेव कांबळे,आनंद काळे,हनुमंत कांबळे,जयराज कांबळे,तानाजी, कांबळे,तानाजी होळकर यांनी विशेष परिश्रम घेतले.सौ कल्पना डांगे आणि किशन कोलते यांनी शुभेच्छा पर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सदाशिव कांबळे यांनी केले.होळकर प्रतिष्ठानच्या वतीने शनिवारी सायंकाळी 6 वाजता औसा शहरातील मुख्य रस्त्यावरून पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक पारंपारिक धनगरी गजा ढोल वाद्याच्या निनादास येळकोट येळकोट जय मल्हार चा जयघोष करीत भंडाऱ्याची मुक्तपणे उधळण करून कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.