आमदार संग्राम जगताप यांच्या वर गंभीर गुन्हे दाखल करुन कायदेशीर कारवाई करा - सय्यद मुजफ्फर अली इनामदार
औसा प्रतिनिधी
राष्ट्रवादी ( अजित पवार)गट चे अहेमदनगर चे आमदार
संग्राम जगताप यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात मुस्लिम समाजाविरोधात आक्षेपार्ह, द्वेषमुलक आणि धार्मिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य केले आहे. हे वक्तव्य अत्यंत खेदजनक असून मुस्लिम समाजाच्या भावना दुखावणारे आहे. हे वक्तव्य संविधानिक मुल्याना हरताळ फासणारे असून दोन समाजांमध्ये तेढ आणि तणाव निर्माण करणारे आहे.
सदरील वक्तव्याच्या व्हिडिओ सोशल मिडीयावर प्रसारित झाला असून मी स्वतः माझ् या मोबाईलवर तो व्हिडिओ पाहिला आहे.. सदर व्हिडिओ पुरावा खालील युटुब लिंकवर आजरोजी उलब्ध आहे.
आमदाराच्या या वर्तणामुळे धार्मिक सलोखा धोक्यात आला असून, कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे खालील कलमान्वये संबंधित आमदार संग्राम जगताप यांच्याविरुध्द योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी.
भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत.
कलम 153A-धार्मिक तेढ निर्माण करणे.
कलम 295A-धार्मिक भावना दुखावण्यासाठी जाणिवपुर्वक कृत्य करणे.
कलम 505(2) विविध धार्मिक समूहांमध्ये वैरभाव निर्माण करणारे वक्तव्य करणे.
विनंतीप्रमाणे सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी तसेच व्हिडीओ पुरावा म्हणून तपासण्यात यावा तसेच संबंधीत आमदाराविरुध्द FIR दाखल करुन तातडीने कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अन्यथा समस्थ मुस्लिम समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल अशी तक्रार औसा येथील सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांनी औसा पोलिस स्टेशन येथे दाखल करण्यात आली आहे.यावेळी तक्रार दाखल करताना खारी रफीक सिराजी, अँड समीयोद्दीन पटेल, नसीर कुरेशी, शेख फारुख सर, डॉ वहीद कुरेशी, मौलाना अबुल खादर, सय्यद मुजफ्फर अली इनामदार आदिची उपस्थिती होती.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.