औसा (प्रतिनिधी):
श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था, हासेगाव संचलित लातूर कॉलेज ऑफ डी. फार्मसी चा एमएसबीटीई अंतर्गत घेण्यात आलेल्या डी. फार्मसी उन्हाळी परीक्षा 2025 चा निकाल नुकताच जाहीर झाला असून, महाविद्यालयाने तब्बल ९० टक्के निकाल प्राप्त करत शैक्षणिक गुणवत्तेची ठोस पावती दिली आहे.
द्वितीय वर्षात
कु.पडवळे अंजुम हिने ८४.५५% गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिच्या पाठोपाठ कु. श्रेया तावडे हिला ८३.२७% गुण मिळाले असून ती दुसरा क्रमांक पटकावला आणि कु.गायत्री मळभागे हिने ७७.७३% गुण मिळवत तिसरा क्रमांक मिळवला.
प्रथम वर्षात
कु.मधुमती गायकवाड हिने ७८.९०% गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. तर कु. आकांक्षा गरड हिने ७०.१०% गुणांसह दुसरा क्रमांक प्राप्त केला.
या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. भीमाशंकरप्पा वावगे, सचिव मा. वेताळेश्वर बावगे, संचालक मा. नंदकिशोर बावगे, तसेच प्राचार्य डॉ. नितीन लोणीकर व इतर सर्व युनिटचे प्राचार्य, प्राध्यापकवर्ग आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.
यावेळी प्रा. देशमुख संग्राम, प्रा. दीपक जोशी, प्रा. गणेश बानसोडे, प्रा. शेख कादर, प्रा. स्नेहा वैरागकर, प्रा. सरदे ऋषिकेश, प्रा. चुडीवाले गौसुद्दीन, तसेच सर्व प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत त्यांच्या यशात मोलाचा वाटा उचलला.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.