*मुलीच्या लग्न कार्यासाठी घरात ठेवलेल्या पैशावर डल्ला मारणाऱ्या चोरटयांना १२ तासाचे आत रोख रक्कमसह अटक .गांधी चौक पोलीसांची उत्कृष्ट कामगिरी.*
लातूर (प्रतिनिधी) याबाबत थोडक्यात माहिती की,दि.०८/०६/२०२५ रोजी पोलीस ठाणे गांधी चौक हद्दीतील लाड गल्ली येथील एका घरामध्ये कडीकोंडा तोडून लोखंडी पेठीचे कुलूप तोडून मुलीच्या लग्न कार्यासाठी ठेवलेली रोख २,८०,००० रुपये अज्ञात आरोपीने चोरल्याची घटना घडली होती. त्यावरून पोलीस ठाणे गांधी चौक येथे ०९/०६/२०२५ रोजी तक्रारदाराने दिलेल्या फिर्याद वरुन पोस्टे गांधी चौक, लातूर येथे गुरनं. २४१/२०२५ कलम ३३१(१), ३०५ (अ) बी.एन.एस. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर रणजीत सावंत यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे गांधी चौक ते पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांच्या नेतृत्वातील पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे
१) सतिष हुकूमचंद लाड, वय ५० वर्षे,रा. लाड गल्ली लातूर
२) संतोष विजयकुमार चापोलीकर वय ४५ वर्षे रा. लाड गल्ली लातूर.
यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सदर गुन्ह्यात चोरीस गेलेली रक्कम २,८०,०००/- रोख रक्कम व गुन्हयात वापरलेली मोटार सायकल असा एकूण एकूण ३,४२,०००/-मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस ठाणे गांधी चौक करीत आहेत.
सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे गांधी चौक चे पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांचे मार्गदर्शनात पथकातील पोलीस उपनिरीक्षक अक्रम मोमीन, पोलीस अमलदार राजेंद्र टेकाळे, प्रकाश भोसले, राम गवारे, शिवाजी पाटील, संतोष गिरी यांनी केली आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.