जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या उपस्थितीत
वटपौर्णिमेनिमित्त वृक्षारोपण
लातूर, दि. १० (प्रतिनिधी): जिल्हा प्रशासनामार्फत वृक्षारोपण मोहिमेंतर्गत जास्तीत जास्त झाडे लावण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. वटपौर्णिमेचे औचित्य साधून प्रत्येक कुटुंबाने किमान १० झाडे लावावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले होते. वन विभागामार्फत साखरा येथील विलासराव देशमुख वन उद्यानात जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांच्या उपस्थितीत ५० वडाची रोपे लावून या उपक्रमाला सुरुवात झाली.
रोहयोच्या उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, सहायक वनसंरक्षक वैशाली तांबे, वृक्षारोपण मोहिमेत सहभागी सुनंदा जगताप, वनपरिक्षेत्र अधिकारी धनंजय पोटे, श्रीमती नागरगोजे, वनपरिमंडळ अधिकारी नीलेश बिराजदार, टी. एस. चिल्ले, पी. टी. देवकरण, वनरक्षक महेश पवार, बालाजी पाटील, गोविंद घुले, धम्मसागर कांबळे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत यंदाची वटपौर्णिमा वडाची झाडे लावून साजरी करण्यात आली. या उपक्रमाची सुरुवात श्रीमती ठाकूर-घुगे यांच्या हस्ते साखरा येथील विलासराव देशमुख वन उद्यानात वडाचे झाड लावून झाली. यावेळी ५० महिलांनीही वडाची झाडे लावून या झाडांची पूजा केली.
*****
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.