हेल्थ टिप्स मुतखडा (किडनी स्टोन्स)-*

 *मुतखडा (किडनी स्टोन्स)-*



            मुतखडा म्हणजेच किडनी स्टोन्स होणं. ही अतिशय सामान्य प्रक्रिया आहे. पण ती अतिशय त्रासदायकही असते. त्यामुळे किडनीला आणि पर्यायाने आपल्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे किडनी स्टोन्स म्हणजेच मुतखडा म्हणजे नेमकं काय हे जाणून घेणं गरजेचं आहे. मुतखडा म्हणजे काय असा प्रश्न रूग्णांना अन् सर्वसामान्यांच्या मनात असतो. त्याविषयी...


*मुतखडा म्हणजे काय?*

मुतखडा हा लघवीमधून वेगळ्या होणाऱ्या कॅल्शियम फॉस्फेट आणि कॅल्शियम ऑक्झॅलेटसारख्या विशिष्ट क्षारांच्या स्फटीक कणांपासून बनलेले कडक पदार्थ असतात. 


*मुतखडे बनतात कसे?*


खडे हे लघवीमधील कॅल्शियम इ. सारख्या खडे बनविणाऱ्या विशिष्ट केमिकल्सची तीव्रता वाढण्यामुळे होतात. हे खडे मूत्रपिंडामधून रेटर्सकडे सरकतात. हे खडे लघवीच्या मुक्त प्रवाहामध्ये अडथळा आणू शकतात, ज्यामुळे पोटात फार दुखतं.लघवीचे प्रमाण कमी झाल्याने किंवा लघवीतील मुतखडा तयार करण्याऱ्या घटकांचे प्रमाण वाढल्याने मुतखडा तयार होतो.

पाणी अथवा पातळ पदार्थ कमी घेण्याने किंवा श्रम, व्यायाम, जुलाब या कारणांनी पाण्याचे शरीरातील प्रमाण कमी झाल्याने मुतखडा तयार होण्याचे प्रमाण वाढते.


मूत्रपिंडात किंवा लघवीच्या मार्गात तयार होणाऱ्या कठीण स्फटिकजन्य पदार्थाला मुतखडा म्हणतात. लघवीतील न विरघळलेले स्फटिकजन्य पदार्थ ज्यावेळी एका ठिकाणी जमा होतात त्यावेळी मुतखडा तयार होतो.


*हे खडे असतात कुठे?*


हे खडे मूत्राच्या मार्गामध्ये मूत्रपिंडापासून युरेथ्रापर्यंत कुठेही असू शकतात. पण साधारणपणे मुत्रपिंड आणि युरेटरमध्ये असतात.


*कारणं आणि जोखमीचे घटक कोणते आहेत?*


अनेक घटकांमुळे मुतखडा होण्याची जोखीम वाढू शकते. मुतखड्यांचा कुटुंबातील इतिहास, पुरेसे द्रवपदार्थ न पिणं आणि जलशुष्कता (डीहायड्रेशन), गरम आणि दमट वातावरणामध्ये राहणारे लोक (शरीरातून पाणी मोठ्या प्रमाणावर जाण्यामुळे), लघवीमध्ये कॅल्शिअम, फॉस्फेट, ऑक्झॅलेट इ. सारख्या केमिकल्सचं प्रमाण जास्त असणं. काही विशिष्ट प्रकारच्या अन्न पदार्थांचं सेवन.


*कोणत्या प्रकारच्या अन्न पदार्थांमुळे मुतखड्यांची जोखीम वाढते?*


अनेक प्रकारच्या अन्न पदार्थांमुळे मुतखड्याची जोखीम वाढू शकते. दूध आणि दूधाचे पदार्थ (कॅल्शियम खडे), चॉकलेटस्, सॉफ्ट ड्रिंक्स, शेंगदाणे, चहा इ. चिकन, मासळी, अंडी इ. सारखे मांसाहारी पदार्थ, टोमॅटो, पालक कोबी, इ. सारख्या भाज्या.


*मुतखड्याची लक्षणं कोणती?*


पाठ आणि मूत्रपिंडे किंवा पोटाच्या खालच्या भागामध्ये तीव्र पेटके येऊन दुखणं, मळमळणं आणि उलट्या होणं, ह‌मिॅटुरिया- लघवीमधून रक्त जाणं, वारंवार लघवीला लागणं, लघवी करतेवेळी दुखणं/ जळजळणं, ताप आणि हुडहुडी.


सर्व प्रकारच्या खड्यांमुळे वेदना होते काय?


३-४ मिमी आकाराच्या खड्यांमुळे दुखणार नाही. असे खडे भरपूर पाणी पिऊन बाहेर काढून टाकले जाऊ शकतात.


*मुतखड्यांचे निदान कसं करण्यात येतं?*


डॉक्टर मुतखड्याचे निदान वैद्यकिय इतिहास, सध्याची लक्षणं, मुतखड्याच्या मागील इतिहासाविषयी आणि वैद्यकिय स्थितीच्या मागील इतिहासातून मुतखड्याचे निदान करतात. तसंच पोटाची तपासणी, ताप हे लघवीच्या मार्गाच्या संसर्गाचं लक्षण असू शकेल ज्यासाठी अँट‌बिायोटिक्स घ्यावी लागतील. लघवीमध्ये रक्त, किटाणू आणि लघवीचे स्फटीक (कण) आहेत काय हे पाहण्यासाठी लघवीचं विश्लेषण केलं जातं.


*इमेजिंग चाचण्या*


मुतखड्याच्या निदानासाठी वापरण्यात येणाऱ्या इमेजिंग चाचण्यांमध्ये एक्स- रे अल्ट्रा साऊंड आणि कॉम्प्युटेड टॉमोग्राफी (सीटी) स्कॅनचा समावेश आहे.


*अनुषंगिक उपाय*


१. मूतखडा (किडनी स्टोन) होण्याचे सर्वात सामान्य कारण म्हणजे पाणी कमी प्रमाणात सेवन करणे, त्यामूळे दिवसातून कमीतकमी ४- ५ लीटर पाणी सेवन करण्याचे उद्दिष्ट ठेवावे.

२. सकाळी उठल्याबरोबर जास्तीतजास्त प्रमाणात पाणी प्यावे.

३. टोमॅटो, पालक, दूध, दुधाचे पदार्थ वर्ज्य केल्यास काही प्रमाणात मदत होऊ शकते.

4. जास्त कालावधीसाठी लघवी रोखून धरू नये.

५. ताकदीचा व्यायाम वर्ज्य करावा.

६. ड जीवनसत्वाची (vitamin d) पूरक मात्रा वर्ज्य करावी.

7. सातूच्या पाण्याचा उपयोग फायदेशीर ठरू शकतो.

*आता आपल्या औसा शहरा मध्ये  मुंबई चा थायरोकेअर रिसर्च ब्लड(रक्त) कलेक्शन सेंटर/लॅब*

           फुल्ल बॉडी हेल्थ चेकअप                  

    ~*6500*~ रु.चे 65 टेस्ट फक्त*1400* रु मधे।*रिसर्च सेंटर लॅब मुंबई मधे MD डॉ.टेस्ट करतील।*

★CBC-28 टेस्ट- कम्प्लेट ब्लड

    काउन्ट,पेशी,रक्ताची कमतरता,कॅन्सर प्रथम टेस्ट

* Cardiac Marker-4 टेस्ट

हार्ट/दिल/हृदया साठी

★KFT-4 टेस्ट - किडनी प्रोफाइल.

★LFT-11 टेस्ट लिव्हर प्रोफाइल,पिवळा कावीळ.

★प्रोटीन,अलबुमीन,ग्लोब्युलीन-3 टेस्ट

★(HbA1C,ABG):2 टेस्ट मागील 3 महिन्याचे एवरेज शुगर।

★Lipid Profile-8 टेस्ट 

कोलेस्टेरॉल(चरबी)हार्ट प्रोफाइल।

★T3,T4,TSH-3 टेस्ट थायरॉईड प्रोफाइल।

★Uric Acid-गुडघे दुखणे ,वात,मुतखडा.

★Calcium-जॉईंट पेन,हाडाची मजबुती।

★Iron-कमझोरी।

*लॅब टेकनोलॉजिस्ट:*

22 वर्षाचा अनुभव (एक्सपेरिएंस):

अतिख शेख(M.Sc,MLT,DMLT)

     *शासनमान्य*

आधार कॉम्प्युटराइझ्ड क्लिनिकल लॅब(खून,रक्त तपासणी)& थायरोकेर कलेक्शन सेंटर,कुमारस्वामी कॉलेज च्या समोर ,ICICI बँकेच्या  पाठीमागे,औसा।

*सकाळी 6:00 से रात्री 9:00 वाजे पर्यंत।*

*शुगर पेशंट,वयोवद्ध आणि स्त्रियां साठी घरपोच सोय*

Call:9822944421,7972997543

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या