सद्भावनेने राहु या !
(कवी: बशीर शेख "कलमवाला")
डोळे भरून पाहावे,
मनामध्ये घर करावे,
प्रेम, एक्याने राहु या,
सद्भावनेने राहु या!
वाईट विचारांशी लढतो,
सद्भावनेचा दीप पेटतो,
मानवतेचा आदर्श मांडतो
एकतेची मशाल पेटवू या,
सद्भावनेने राहु या!
एकतेची माळ गुंफूया,
संत- पैगंबरांचे विचार रूजवूया,
माणसाला जागरूक करूया
नैतिकतेचा पाठ वाचू या,
सद्भावनेने राहु या!
ईश्वराचा हेतू साकारूया,
शांतता, समानता रुजवूया,
न्याय-बंधुतेची पालवी फुलवूया —
सजग, सुजाण सकल जणांनो
समतेचे गीत गाऊ या,
सद्भावनेने राहु या!
------------------------------------आपणांस सद्भावना मंच महाराष्ट्र शाखा लातूरमध्ये सहभागी व्हायचे असेल तर खालील नंबरवर संपर्क करा...
सद्भावना मंच, लातूर
समन्वयक: 9823460113
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.