औशात लाॅकडाऊन नंतर जनावरांचा बाजार सुरू

 औशात लाॅकडाऊन नंतर जनावरांचा बाजार सुरू
















औसा मुख्तार मणियार

औसा : गेल्या दोन महिन्यापासून औसा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील जनावरांचा बाजार कोरोनामुळे बंद होता .मात्र आता लातूर जिल्ह्यातील रुग्ण संख्या आटोक्यात आल्याने पुन्हा एकदा जनावरांचा बाजार सुरू करण्याचा निर्णय बाजार समिती प्रशासनाने घेतला आहे.


औसा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे दर गुरुवारी जनावरांचा बाजार भरविला जातो मात्र कोरोना च्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील दर आठवडी व जनावरांचा बाजार यावर बंदी लादण्यात आली होती. त्यामुळे औसा कृषी उत्पन्न बाजार समितीने जनावरांचा बाजार बंद ठेवला होता. शासनाने कोरोनाचे निर्बंध शिथिल केल्याने औसा येथील जनावरांचा बाजार आज  दिनांक १७ जुन २०२१ गुरुवार पासून पूर्णवत सुरुवात करण्यात आल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक राजेंद्र भोसले यांनी दिली आहे .जनावरे बाजारात प्रतिबंधक उपाय योजनांची दक्षता घेऊन भरविला जाणार असल्याची माहिती मुख्य उप प्रशासक किशोर जाधव यांनी दिली आहे .बाजार घटकांना कामकाजाची वेळी मास्क लावणे,सॅनिटायझरचा वापर करणे, सोशल डिस्टंसिंग चे पालन करणे गर्दी होणार नाही याची दक्षता घेउन दर गुरुवारी जनावरांचा बाजार भरविला जाणार आहे . तरी बाजारात  शेतकऱ्यांनी जनावरे खरेदी विक्री करिता आणन्याचे आहवान सचिव मुस्ताक शेख यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या