आ.रमेशअप्पा कराड यांच्याकडून निजाम शेख यांचा सत्कार
लातूर/प्रतिनिधी:मध्य रेल्वेच्या झोनल सल्लागार समितीवर सलग तिसऱ्या वेळी निवड झाल्याबद्दल भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांनी पत्रकार निजाम शेख यांचा सत्कार केला.
स्व.गोपीनाथराव मुंडे यांचे कार्यकर्ते असणारे निजाम शेख यांची मुंडे यांच्याच शिफारशीवरून मध्य रेल्वेच्या झोनल सल्लागार समितीवर पहिल्या वेळी निवड झाली होती.मिळालेल्या संधीचा वापर करत शेख यांनी रेल्वे प्रवाशांना अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या. प्रवाशांचे प्रश्न सोडविण्यासाठी ते सतत कार्यरत राहिले.यामुळेच आता सलग तिसऱ्या वेळी त्यांची या समितीवर निवड झाली.याबद्दल आ.
रमेशअप्पा कराड यांच्या कार्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला.शाल,श्रीफळ व संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा देऊन आ.कराड यांनी निजाम शेख यांना सन्मानित केले.
लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांना अधिकाधिक सुविधा मिळवून देण्यासाठी आपल्या पदाचा वापर व्हावा, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी भाजपा अध्यात्मिक समन्वय आघाडीचे जिल्हाध्यक्ष
ज्ञानोबा भिसे,दिलीप धोत्रे, कोळगांवचे उपसरपंच सदाशिव राठोड यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.