लातूरचे भूषण महाराष्ट्र भूषण
मास्क वापरा सामाजिक अंतर राखा स्वच्छ हात धुवा स्वच्छता पाळा कोवीडला पळवून लावा
आदरणीय नामदार अमितभैय्या विलासरावजी देशमुख यांचे राज्य सरकार मधील कार्य विशेष वाखाणण्याजोगी आहे. कोविड १९ सर्वांच्या विशेष करून सरकारच्या परीक्षेचा काळ प्रथम मानवी जीवन सुरक्षित राहायला हवे. त्यानंतर उद्या व्यवसायाकडे लक्ष देता येईल. त्यानंतरच उर्वरित विश्व होय. या परीक्षेत नामदार अमितभैय्या विलासराव देशमुख covid-19 चे आव्हान स्वीकारले. सर्व आव्हाणावर यशस्वीरीत्या मात केली. त्यासोबतच जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा वेळेवर झाला पाहिजे. सार्वजनिक वितरण प्रणाली सक्षम करायला हवी. यावर त्यांनी विशेष भर दिला . कोविड निर्मूलनासाठी गावपातळीवर वैद्यकीय पथके पाठवून प्रयत्न करण्यात येत आहेत. या कालावधीत शेती क्षेत्राकडे दुर्लक्ष व्हायला नको. कारण शेती हा व्यवसाय आपल्या मानवी जीवनाचा एकूण सर्वांचा मूळ आधार आहे. हे लक्षात घेऊन त्यांनी शेती आणि शेतकरी यांच्या कामात त्यांना लागणारी साधने, शेती अवजारे मिळायला हवीत. यासाठी कृषी वस्तूंची दुकाने संचार बंदीच्या काळातही चालू ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. समाजातील तळागाळातील वृद्ध महिला, अपंग, निराधारांच्या प्रश्नाकडे विशेष लक्ष देण्यात आले होते. उदाहरणात श्रावणबाळ योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान त्यांच्या खात्यावर वेळेवर तसेच त्यांच्या घरापर्यंत पोहचवण्याचे प्रयत्न कौतुकास्पद म्हणावे लागतील. लोकनेते स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब यांचे जेष्ठ सुपुत्र, आपले सर्वांचे लाडके, युवा नेतृत्व अर्थात संपूर्ण समाजाचे आधार वड. लोकनेते स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांनी समाजातील सर्वच घटकावर तो लहान-मोठा असो कसा असो सर्वावर पुत्रवत प्रेम केले. शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी यांच्याकडे त्यांचे विशेष लक्ष असे. त्यांच्या जाण्यामुळे निर्माण झालेली पोकळी आदरणीय भैय्यासाहेब यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाच्या बळावर कार्यकर्त्यांच्या मदतीने नियोजनबद्ध पद्धतीने भरुन काढली. राज्यात आघाडीचे सरकार अधिकारावर आहे. हे मान्य आहे. तीन पक्ष सरकार मध्ये कामे करताना सहाजिकच मर्यादा येतात. आमदार भैय्यासाहेब आपल्या नियोजनबद्ध पद्धतीने दोन वर्षांपासून या कठीण काळात अथक परिश्रम घेत आहेत. आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने हे विशेष आहे. जान बची लाखो पाये अशी एक म्हण आहे. या काळात प्रथम प्राधान्य शारीरिक आरोग्य स्वास्थ्याला द्यायला हवे. आपण आपले स्वास्थ्य चांगले राहिले तरच उद्या परवा. भावी काळात पुनश्च हरिओम करत सर्व क्षेत्रात यशस्वीपणे काम करणार आहोत. विशेषकरून सर्वच क्षेत्रात अंमलबजावणी त्यासोबतच संचारबंदीच्या काळात ही जनतेला जीवनावश्यक वस्तूंचा वेळेवरच पुरवठा व्हायला हवा. यावरही त्यांनी कटाक्षाने प्रशासनाला सूचना दिल्या. या काळात शेतकरी, निराधार महिला लाभार्थ्यांना त्यांच्या योजनांचा लाभ मिळाला पाहिजे. या परीक्षेच्या काळात भैय्यासाहेबांनी सर्वांना समान न्याय देण्याची मोलाची कामे केली आहेत. वास्तविक पाहता ही परीक्षा मा.ना आमदार देशमुख उत्तीर्ण झाली आहेत. या निमित्ताने आम्हाला लोकनेते स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांची आठवण येते. शेती व्यवसाय आपल्या संपूर्ण समाजाचे भरण-पोषण थोडक्यात शेती आणि शेतकरी यांचे नाते आई आणि मुलाचे आहे. शेतकरी रात्रंदिवस कष्ट करून करतो. आधुनिक पद्धती मध्ये नवीन साधने उपलब्ध होत आहेत व शेती व्यवसायात दररोज नवीन नवीन शोध सामग्री निर्माण होत आहे. जेणेकरून शेतकऱ्यांची कष्ट कमी व्हावेत, पडणारा ताण कमी व्हावा, उत्पादनात वाढ व्हावी, शेतीमालाला योग्य भाव मिळावा या हक्काच्या पूर्तीसाठी सरकार प्रयत्नशील आहे. नवीन नवीन शोध शेती व्यवसायात पुरवठा करत आहेत. ऐकत आहे असे असताना व्यवसायाला संचारबंदीच्या काळात थोडक्यात प्रोत्साहनच मिळाले म्हणावे लागेल. कृषी साहित्याच्या पुरवठ्याची दुकाने उघडे ठेवून विक्रेते सेवा देत आहेत.मांजरा परीवारातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे मोलाचे प्रयत्न होत आहेत. औषध विक्रेते, डॉक्टर, पोलीस, प्रशासन अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, आशा कार्यकर्ती समाजाची आवश्यकती काळजी घेत आहेत. समाजातील प्रत्येक घटकासाठी रात्रंदिवस राबत आहेत. सेवा देत आहेत. आमदार आमितभैया यांचे लातूर जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे आरोग्य सुदृढ राहावे , समाज स्वस्थ रोगमुक्त हवा. व्यक्ती समाज राज्य आणि देशाची उत्पादन क्षमता वाढावी,आर्थिक स्तर उंचावला पाहिजे, एकूणच 2021-22 मधील राज्याचे आर्थिक चित्र सुदृढ असायला हवे यादृष्टीने
प्रयत्न चालू आहेत. राज्यात आघाडीचे सरकार आहे. काम करताना मर्यादा येतात असतानाही आपल्या पूर्व अनुभवाच्या बळावर अभ्यासावर, लोकनेते देशमुख साहेब यांनी घालून दिलेल्या विकासाच्या आदर्श मार्गावरून वाटचाल करण्याचे जोमाने प्रयत्न होत आहेत. तसेच त्यांना आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब, माजीमंत्री दिलीपरावजी देशमुख यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. त्यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून राज्य सरकार मध्ये विशेष आपला ठसा उमटवला आहे. लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लोकनेते देशमुख साहेबांचे नामकरण हा निर्णय लोक इच्छेचा आदरच म्हणावा लागेल. आमदार माननीय विक्रम काळे यांनी हा प्रस्ताव तातडीने मांडला आणि सरकारनेही त्याची अंमलबजावणी केली योग्य झाले. सध्याच्या कोविड१९ च्या काळात सर्व क्षेत्रात आलेली मरगळ दूर करून सर्वांना प्रोत्साहन देण्याचे कार्य नामदार देशमुख साहेब आगामी काळात करतील. आमच्या शतशः मनःपूर्वक शुभेच्छा!
विलास कुलकर्णी ज्येष्ठ पत्रकार 9552197268
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.