*केवळ आश्वासने देऊन दिशाभूल करणाऱ्या आमदार अमित देशमुख यांचा पराभव अटळ !*
*- भाजप नेते तथा ज्येष्ठ पत्रकार व्यंकटराव पनाळे*
लातूर :- लातूर विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता रंगत घेत आहे. सर्वसामान्य मतदारांमधून भाजपच्या उमेदवार डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
लातूर विधानसभा मतदारसंघातील संभाजी राजे मंडलातील बूथ प्रमुख आणि कार्यकर्त्यांची व्यापक बैठक भाजपा उमेदवार डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मंडल प्रमुख चंद्रकांत खटके यांनी आयोजित केली होती.
या व्यापक बैठकीत बोलताना भाजप नेते तथा ज्येष्ठ पत्रकार व्यंकटराव पनाळे यांनी केवळ आश्वासने देऊन दिशाभूल करणाऱ्या आमदार अमित देशमुख यांचा पराभव अटळ असल्याचे सांगितले.
आता नियतीने ठरवलेल आहे, त्यामुळे देवघरातून अर्चना देवी बाहेर आलेली आहे. आता भ्रष्टाचारी आणि लबाड बोलणाऱ्या निष्क्रिय दैत्याचा शेवट ठरलेला आहे.
कोरोनामध्ये मतदार संघ वाऱ्यावर सोडून परदेश वारी करणाऱ्या शिशुपालाची शंभरी भरलेली आहे !
येत्या २३ नोव्हेंबरला भाजपा उमेदवार डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या विजयाचा गुलाल उधळला जाणार असल्याचे व्यंकटराव पनाळे यांनी अतिशय आत्मविश्वासाने सांगितले.
अहंकारी, दांभिक दैत्याचा शेवट २० नोव्हेंबरला डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या कमळ चित्रासमोरील बटन दाबून करू या. आणि अर्चनाताई चाकूरकर या देवघरातल्या देवीच्या विजयाचा जागरण गोंधळ २३ नोव्हेंबरला होणार असल्याचेही पनाळे यांनी सांगितले.
बूथ प्रमुख आणि आणि कार्यकर्त्यांनी मतदानापासून आपला मतदार वंचित राहणार नाही याची खबरदारी घ्यावी असे सांगून प्रत्येक मतदारापर्यंत आपण पोहोचण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
संभाजी राजे मंडलाच्या या व्यापक बैठकीस मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.