लातूर ग्रामीण, लातूर शहर, औसा विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची ९ नोव्हेंबरला पहिली तपासणी

 लातूर ग्रामीण, लातूर शहर, औसा विधानसभा मतदारसंघातील

उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची ९ नोव्हेंबरला पहिली तपासणी




लातूर, दि. ०७ : विधानसभा निवडणूक-२०२४ अंतर्गत लातूर ग्रामीण, लातूर शहर आणि औसा विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची पहिली तपासणी ९ नोव्हेंबर २०२४ रोजी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात सकाळी १० वाजता होणार आहे. यावेळी उमेदवारांच्या निवडणूक विषयक खर्चाच्या नोंदवहीची तपासणी निवडणूक खर्च निरीक्षक यांच्याकडून केली जाईल.


लातूर ग्रामीण, लातूर शहर आणि औसा विधानसभा मतदारसंघातील निवडणूक खर्च तपासणी ९ नोव्हेंबर २०२४ रोजी होणार आहे. यावेळी उमेदवारांनी स्वत: किंवा त्यांचे प्राधिकृत निवडणूक प्रतिनिधी यांनी खर्चाची नोंदवही, प्रमाणके, निवडणुकीसाठीच्या खर्चाचे बँक पासबुकसह व इतर आवश्यक सर्व अभिलेख्यासह सकाळी १० वाजता संबंधित विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उपस्थित राहावे. तसेच खर्चाच्या नोंदवह्यांच्या तपासणी दरम्यान जनतेचे प्रतिनिधी उपस्थित राहू शकतात आणि प्रत्येक पृष्ठासह 1 रूपया इतकी रक्कम प्रदान केल्यावर कोणतीही व्यती कोणत्याही उमेदवाराच्या खर्चाच्या नोंदवहीची प्रत निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडून घेऊ शकतात.


***** 

Collector & District Magistrate, Latur

Latur Police Department

Chief Electoral Officer Maharashtra


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या