स्थानिक गुन्हे शाखा, लातूर ची कामगिरी, 08 घरफोडीचे गुन्हे उघडकीस, सोन्याच्या दागिन्याची सह 02 लाख 97 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त. दोन आरोपींना अटक*

  *स्थानिक गुन्हे शाखा, लातूर ची कामगिरी, 08 घरफोडीचे गुन्हे उघडकीस, सोन्याच्या दागिन्याची सह 02 लाख 97 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त. दोन आरोपींना अटक*





लातूर रिपोर्टर न्यूज़ ब्यूरो 

                या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे यांचे आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक श्री.अनुराग जैन, उपविभागीय पोलिस अधिकारी लातूर शहर श्री.जितेंद्र जगदाळे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा श्री.गजानन  भातलवंडे यांचे नेतृत्वात लातूर जिल्ह्यात विविध पोलीस स्टेशनला घडलेले मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्याकरिता पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सूचना व मार्गदर्शन करण्यात आले होते.

             पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता विशेष पथके स्थापन करून गुन्हे उघड करण्याचे प्रयत्न सुरू होते .

           त्या अनुषंगाने माहिती घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला  माहिती मिळाली की, पोलीस ठाणे विवेकानंद चौक येथे दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी हा त्यांचे राहते घरी येणार आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर पथक तात्काळ औसा तालुक्यातील भादा या ठिकाणी पोचून तेथे सापळा लावला. थोड्याच वेळात त्याचे राहते घरातून संशयित आरोपी नामे आकाश उर्फ बाबूराव कांबळे, वय 21 वर्ष, यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याच्या इतर साथीदारांसह लातूर जिल्ह्यातील विविध पोलिस स्टेशनच्या हद्दीत घरफोडीचे गुन्हे केल्याचे कबूल केले

         त्यावरून त्याचे साथीदार नामे माणिक बालाजी नरवटे, वय 35 वर्ष, राहणार तांबटसांगवी तालुका अहमदपूर येथून ताब्यात घेऊन त्यांनी विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीत घरफोडी चोरी करून मिळवलेले सोन्याचे दागिने अंदाजे किंमत 02 लाख 97 हजार 400 रुपयांचे दागिने त्यांच्याकडून जप्त करण्यात आले आहेत तसेच त्याचे इतर साथीदारांचा शोध सुरू आहे.

नमूद आरोपींनी त्याच्या इतर साथीदारांसह पोलीस ठाणे 

1)जळकोट 

2)अहमदपूर 

3)किल्लारी

4) उदगीर ग्रामीण

5) विवेकानंद चौक 

च्या हद्दीमध्ये घरफोडीचे 08  गुन्हे केल्याचे कबूल करून 06 गुन्ह्यात चोरलेला मुद्देमाल हजार केला. 

           नमूद आरोपींना पोलीस स्टेशन विवेकानंद चौक येथे दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक 142/2022 कलम 454, 457,380 भा द वि मध्ये अटक करण्यात आली असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस स्टेशन विवेकानंद चौक चे पोलीस अधिकारी व अंमलदार करीत आहेत.

             सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.गजानन भातलवंडे यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल बहुरे, सहाय्यक फौजदार संजू भोसले, पोलीस अमलदार राम गवारे, सुधीर कोलसुरे ,बंटी गायकवाड, माधव बिलापटे, सिद्धेश्वर जाधव , नाना भोंग सचिन धारेकर, जमीर शेख, नकुल पाटील,केंद्रे ,यांनी पार पाडली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या