रोटरीच्या सायक्लोथॉन स्पर्धेत ४०० सायकलपटूंचा सहभाग

 


रोटरीच्या सायक्लोथॉन स्पर्धेत 
४०० सायकलपटूंचा सहभाग














   लातूर/प्रतिनिधी:रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊन, रोट्रॅक्ट क्लब ऑफ लातूर मिडटाऊन,इंडियन मेडीकल असोसिएशन आणि लातूर शहर महानगरपालिका यांच्याद्वारे संयुक्तपणे आयोजित सायक्लोथॉन स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून ४०० पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.पर्यावरण आणि आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
  स्पर्धेची सुरूवात बिडवे लॉन येथून शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरिक्षक बिरला,जी.एस.मॉलचे लक्ष्मीरमण भुतडा,ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कुलचे सुयश बिराजदार,बाईक स्टुडिओचे योगेश काळे, चापसी फुड्सचे अनिकेत चापसी,इन्शुअर ड्रीमचे अनंत देशपांडे आणि व्ही जे ॲनॅलिटीकचे अविनाश जाधव यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आली.स्पर्धकांच्या सुरक्षेसाठी पोलिस प्रशासनाने उत्तम बंदोबस्त ठेवला होता.
   १० किमी,३० किमी आणि ५० किमी अशा तीन प्रकारांमध्ये ही स्पर्धा पार पडली.१० किमी स्पर्धेतील स्पर्धकांनी बिडवे लॉन-राजीव गांधी चौक - छत्रपती शिवाजी महाराज चौक - अहिल्यादेवी होळकर चौक - बिडवे लॉन या रस्त्यावर सायकलिंग केली.३० किमी स्पर्धेसाठी बिडवे लॉन-राजीव गांधी चौक - छत्रपती शिवाजी महाराज चौक - अहिल्यादेवी होळकर चौक - महापूर पूल - नेहरूनगर- बिडवे लॉन तर ५० किमी साठी बिडवे लॉन - राजीव गांधी चौक - छत्रपती शिवाजी महाराज चौक - अहिल्यादेवी होळकर चौक - रेणापूर फाटा - कुंभारी - बिडवे लॉन असा मार्ग होता.
    ३० किमी प्रकारामध्ये विकास कातपुरे,श्रवण उगीले,योगेश करवा,शंकर लांडगे,डॉ.हनुमंत कराड, गायत्री केदार,स्वप्ना मुंडे, ज्योती राजे,डॉ विमल डोळे आणि शिल्पा पाठक यांनी यश संपादन केले.५० किमी प्रकारामध्ये सुमेश सुडे, गंगाधर बिराजदार,संजय महाजन,संजय सप्रे,डॉ. आरती झंवर,कोमल शिंदे,डॉ. वैशाली आणि सुवर्णा पवार यांनी यश मिळविले. 
   या प्रसंगी संपूर्ण भारतभर सायकल भ्रमंती करणारे सायकलपटू संतोष बालगीर, लातूर ते स्टॅच्यू ऑफ युनिटी सायकलस्वारी करणारे गंगाधर बिराजदार,लातूर ते शिवनेरी सायकल राईड करणारे गंगाधर सोमवंशी आणि प्रविण खरवाले, महिलांना सायकलिंग करण्यासाठी प्रोत्साहित करणारे आणि सिंहगड- राजगड-तोरणा अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये देशात तिसरा क्रमांक पटकविणाऱ्या डॉ. आरती झंवर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
   कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. ओमप्रकाश झुरूळे आणि प्रा.दिनेश सोनी यांनी तर आभार श्रवण बियाणी यांनी मानले.कार्यक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनचे अध्यक्ष रो. सतिश कडेल,सचिव दिनेश सोनी,रोट्रॅक्ट क्लब ऑफ लातूर मिडटाऊनचे अध्यक्ष रो. प्रसाद वारद,सचिव सत्यजित धर्माधिकारी, इंडीयन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. सुरेखा काळे,सचिव डॉ. हनुमंत किनीकर यांच्यासह मोठ्या संख्येने रोटरी व रोट्रॅक्ट सदस्य आणि नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रोजेक्ट चेअरमन गिरीश पेन्सलवार, श्रवण बियाणी,श्रीकांत चिद्रेवार,ओंकार बिरनाळे, शौनक दुरूगकर यांच्यासह रोटरी आणि रोट्रॅक्ट च्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या