रंगभूमीवरील शैलीदार अभिनेत्रीला आपण मुकलो
--- अमित विलासराव देशमुख
मुंबई, दिनांक २८
"ज्येष्ठ अभिनेत्री ललिता केंकरे यांच्या निधनमुळे
रंगभूमीवरील शैलीदार अभिनेत्रीला आपण मुकलो आहोत", अशा शब्दांत सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.
"साहित्य संघ मंदिर निर्मित अनेक संगीत तसेच गद्य नाटकांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या भूमिकांमधून रसिकांचे लक्ष वेधून घेतले होते. पती गेले गं काठेवाडी, घेतलं शिंगावर, अंमलदार, तुझं आहे तुजपाशी, सुंदर मी होणार अशा अनेक नाटकांमधील त्यांचा शैलीदार अभिनय रसिकांच्या कायम स्मरणात राहतील", असेही देशमुख यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.