कृषी उत्पन्न बाजार समिती औसा येथील आडत बाजारपेठ १० आगस्ट पासून सुरु होणार

कृषी उत्पन्न बाजार समिती औसा येथील  आडत बाजारपेठ १० आगस्ट पासून सुरु होणार




औसा मुख्तार मणियार

 कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या पंधरा जुलै पासून बंद असलेली औशातील आडत बाजारपेठ दि.१० आगस्ट २०२० सोमवार पासून काही नियम व अटी सह सुरू होत असल्याचे औसा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव मुस्ताक शेख यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.या अनुषंगाने शेतकरी वर्गाची काही अंशी अडचण दूर होणार आहे. सर्व शेतकरी आडत दुकानदार व खरेदीदार यांच्यासह हमाल व संबंधितांना दि.१० आगस्ट २०२० सोमवार रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती औसा व उप बाजारपेठ किल्लारी येथील दैनंदिन व्यवहार सुरू करण्यासाठी व कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमावली करण्यात आली आहे. या नियमावलीत कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये नोंदणीकृत शेतकऱ्यांना व शेतीमालाना प्रवेश दिला जाणार आहे. सर्व शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमालाची नोंद बाजार समितीच्या अॅप वर एक दिवस अगोदर किंवा पूर्वी करावी.प्रत्येक आडत दुकानात प्रत्येकी पांच शेतकऱ्यांना प्रवेश दिला जाईल किंवा जास्तीत जास्त शंभर कट्टे शेतमालाला प्रवेश दिला जाईल.प्रत्येक आडते व खरेदीदार,हमाल बांधवांनी तोंडाला मास्क लावणे बंधनकारक असून सौद्यामध्ये सहभाग घेताना आडते खरेदीदार व मुनीम बाधवांनी तोंडाला मास्क लावणे बंधनकारक राहील.. आपल्या दुकानात सॅनिटायझर व हाथ धुण्यासाठी साबण उपलब्ध असलेल्या पुरतता अहवाल समितीस सादर करावा,विना मास्क फिरणा-यावर प्रत्येकाला दोनशे रुपये दंड आकारण्यात येईल, सर्व आडते खरेदिदार व हमाल बांधवांना बाजारामध्ये प्रवेश करताना ओळखपत्र बंधनकारक राहणार आहे.तेव्हा सर्व आडते खरेदिदार, व्यापारी,मुनीम व हमाल बांधवांनी कोरोना पासून होणा-या संसर्गाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदत करावी व बाजार समितीचे वेळोवेळ रोखण्यासाठी मदत करावी व बाजार समितीचे वेळोवेळी दिलेल्या सुचनाची नियमावलीची अंमलबजावणी करुन आडत बाजर सुरू करण्यास सहकार्य करावे असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समिती औसा यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या