वीज उपकेंद्रे व आॅपरेटरच्या प्रलंबित प्रश्नांबाबत प्रशासन उदासीन...! १९ जानेवारी पासून होणार हल्ला - बोल...कामगार नेते अनिल पुरी यांची माहीती!

 

वीज उपकेंद्रे व आॅपरेटरच्या प्रलंबित प्रश्नांबाबत प्रशासन उदासीन...!
१९ जानेवारी पासून होणार हल्ला - बोल...कामगार नेते अनिल पुरी यांची माहीती!






 
 लातूरः (प्रतिनिधी) महावितरणच्या प्रादेशिक कार्यालयातंर्गत मराठवाड्यातील. लातूर औरंगाबाद परभणी नांदेड बीड उस्मानाबाद जालणा.हिंगोली या आठ जिल्ह्यांचा समावेश आहे.या जिल्ह्यातील वीज उपकेन्द्र देखभाल - दुरुस्ती व प्राथमिक सोयी सुविधा अभावी धोकादायक बनली आहेत.या संदर्भात आँपरेटर संघटनेच्या वतीने महावितरण प्रशासनाकडे अनेक वेळा पञ व्यवहार करण्यात आला आहे.तरीही सबंधीत कार्यालये आँपरेटरच्या प्रश्ना बाबत उदासीन असुन वेळ काढु पणा करत आहेत.या गोष्टीचा निषेध करण्यासाठी व मागण्या मान्य करुन घेण्यासाठी दिनांक 19 जानेवारी पासुन संघटनेच्या वतीने साखळी उपोषण आंदोलन करण्यात येणार असल्याची माहीती संघटनेचे सरचिटणीस नवनाथ पवार व कामगार नेते अनिल पुरी यांनी प्रसिद्धी प्रञकात दिली. अनेक वर्षा पासुन आँपरेटरचे प्रश्न सोडवले गेले नाहीत या मध्ये यञंचालक "पुल" पध्दत बंद करावी,आणिबाणी प्रसंगी यञंचालकांनी केलेल्या कामाची देयके तातडीने निकाली काढावीत,अतिकालीन कामाचा मोबदला देण्यात यावा,उपकेन्द्रांना प्राथमिक सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात,प्रत्येक उपकेंन्द्रात सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावी,परिपञके निघतात पण त्यांची अमलबजावणी करण्यात येत नाही.या व अशा विविध प्रश्ना संदर्भात संघटनेच्या वतीने महावितरण च्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालया समोर दिनांक १९ जानेवारी पासुन साखळी उपोषण आंदोलनात करण्यात येणार आहे.या मध्ये मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील संघटनेचे पदाधिकारी, सभासद सहभागी होणार असून, वेळीच दखल घेऊन आॅपरेटरांना दिलासा देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य विद्युत ऑपरेटर्स संघटनेच्या वतीने अध्यक्ष सुधाकर जायभाये, कार्याध्यक्ष सुधीर इंगळे, उपाध्यक्ष विश्वास साळुंके, कोषाध्यक्ष राजेश्वर क्षीरसागर,उप सरचिटणीस खेमराज तिवाडे, संयुक्त सचिव राजेश बडनखे, माधव गोरकवाड, राजेसाहेब रोंगे पाटील, सोपान पेदे, श्रीकांत राठोड, सुनील बोयनर,नितिन भालेराव, सुनिल कडवे ज्ञानेश्वर चामले, ज्ञानेश्वर बन, महादेव कड, श्रीनिवास संगनवार यांनी केली 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या