न हाथ थाम सके...न पकड सके दामन बडे करीबसे उठकर चला गया कोई...

 

न हाथ थाम सके...न पकड सके दामन
बडे करीबसे उठकर चला गया कोई...





विजयबाबूंचं अखेरचं दर्शन हे असं आमच्या लल्लाटी होतं! हा दैवदुर्विलास म्हणावे, की आम्हां दोस्तांच्या दोस्तान्याची नियतीनं उडवलेली खिल्ली? माझ्या प्रिय मित्राला अखेरचा षरीशुशश्रश्र करण्यासाठी मी, स्वतःच सहकुटुंब होम क्वारंटाईन असल्यानं, उठावनासाठीही येऊ  शकत नाही, असे दुदैव ते कोणते ? मोतीभाऊ, विजयशेठ आणि रतनशेठ देखील  माझ्या उस्मानाबाद मुक्कामातील सौंदर्यस्थळं होती. लोकमतच्या औरंगाबाद आवृत्तीत तब्बल 33 वर्षं विजयबाबूंबरोबर काम करतानाचे प्रत्येक प्रसंग आजही मनांत  ताजे आहेत. मा. राजेनबाबूंबरोबर आम्ही लातूर- उस्मानाबादचे अनेक दौरे केले. अनेकदा उस्मानाबादला गेल्यानंतर घरी जेवल्याशिवाय विजयशेठ व मोतीभाऊ सोडत नसत. हे दोघे बंधू म्हणजे खर्‍या अर्थानं दो हंसोंका जोडा ! काकाजी व रतनशेठ गेल्यानंतर श्रीकृष्णानं करंगळीवर पर्वत पेलावी, तसं या दोघांनी सगळ्या कुटुंबियांभोवती ओंजळ धरुन कुणाला आच लागू दिली नाही.
संस्कृती वितळत चाललीय् म्हणून फुकाचा शोक करणं हे झालं चतुर माणसाचं लक्षण. पण निखार्‍यावरची राख फुंकून चैतन्य पुन्हा चेतवायला’ डोळस बघणं’ च असावं लागतं. टेबलावरच्या दिव्याच्या वर्तुळाबाहेरही बघावं लागतं.काळोखाचा अनाहत नाद ऐकत मोतीभाऊ नि विजयबाबूंनी समाजाच्या श्वासांशी नातं सांगत फार फार पारदर्शक आणि प्रामाणिक पत्रकारिता केली.... सुखदु:ख भयव्यामोह आशानिराशेची ओझी घेऊन. काळोखातून काळोखातच सरकणारी ही आयुष्यं जगताना सजग पत्रकारितेची अशी झाडं आपल्या आयुष्यातून कायमची थोडीच वगळता येतात? सामाजिक बांधिलकीचा दिवा ओंजळीत घेणारे हे बंधू मराठवाड्यातील पत्रकारितेच्या अंगणात सदैव प्रकाशवाटाच पेरत राहिले. त्यांनी अविरतपणे आयुष्यभर अव्यभिचारी निष्ठेनं ग्रामीण मातीचा मृदगंध असलेल्या लेखणीचा जागर चेतविला. रोजच्या जगण्याची भ्रांत असलेल्या आणि मोडून पडलेल्या सामान्य माणसांच्या जिंदगीतील अंधाराशी हे दोघेही दोन हात करीत राहिले. हा अंधार व्यवस्थेला नि समाजाला पुरतं  गिळून टाकायच्या आत एखादी तरी पणती या अंधाराच्या बुडाशी आपण लावावी म्हणून विजयबाबू नि मोतीभाऊ संवेदनशीलतेचा प्रकाश देत राहिले. भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून दोघांनीही ह्या परिसराच्या नकाशावर आपली पदचिन्हं उमटविली. मग झोपडीला काळोखाला पुरून उरायचा त्यांचा चिमूटभर प्रकाशही. वंचितांच्या जगण्यात आत्मविश्वासाची आणि प्रबोधनाची पहाट उचलावी म्हणून दोघेही तुळजापूरच्या आईभवानीला लेखणीच्या माध्यमातून साकडं घालत राहिले....दार उघड, बये...दार उघड... ज्ञानाचं दार उघड...प्रबोधनाचं दार उघड...कल्याणाचं दार उघड ..!
खरं तर, उंचीवरची फुलेही आपल्याला आवडत असतातच. पण तिथवरचं अंतर  कापायचं कसं ? जरा टाचा वर करुन हात वर केले, की जी फुलं आपल्या हाताला येतात ती फुलं जवळची वाटतात. मोतीभाऊ व विजयजी अशा फुलांशी आणि पिचलेल्यांच्याही श्वासांशी एकाचवेळी नातं सांगत राहिले. माणसाला माणसात इतका इंटरेस्ट का वाटतो? प्रश्न सहज नि सोपा वाटतो. पण उत्तर मिळण्यासाठी गाठ पडावी लागते एखाद्या नवजीवनाचा मंत्र फुंकून अचेतनात प्राण चेतविणार्‍या विजय किंवा मोतीचंद बेदमुथांची!! मला गजल लेखनाची आवड आहे. प्रवासात अनेक कविता, गजलला मी त्यांना ऐकवायचो. एकदा तर त्यांनी मला जोसेफ जॉबर्टचं अर्थपूर्ण वचन ऐकवून गारच केलं --
र्धेी रीीर्ळींश रीं र्ीीीींंह ींर्हीेीसह िेशीीूं.... ख रीीर्ळींश रीं िेशीीूं ींर्हीेीसह र्ीीीींंह... असं ते म्हणाले नि मी दीड फूट उडालोच !! मी आश्चर्यानं म्हणालो, विजयशेठ हे असलं वाचता कधी? त्यावर ते नुसतंच हसले. लातूर-उस्मानाबादच्या भूकंपाला 25 वर्षं झाल्यानंतर किल्लारीला भारतीय जैन संघटनेचा कार्यक्रम मा. लोकनेते  शरदचंद्रजी पवार व शांतीभाऊ मुथ्थांच्या उपस्थितीत एक भव्य समारंभ आयोजिण्यात आला होता. जवळपास दहाएक हजार तरी लोकं असावेत. त्या अतिभव्य सोहळ्याचे सूत्रसंचलन माझ्याकडं होतं. मला तपशीलाची व आकडेवारीची माहिती देण्यासाठी विजयबाबू स्टेजवर माझ्या बाजूला बसून नावं सांगत होते. शांतीभाऊंचं मनोगत सुरु असतानाच विजयबाबू मला हळू आवाजात म्हणाले, हा जगन्नाथाचा रथ रेटायला समाजात आणखी हात उगवायला हवेत! सुखवस्तू आयुष्य जगणार्‍या ह्या माणसाची समाजाशी बांधिलकी अशी विलक्षण होती. काही माणसं काम मूठभरच करतात, पण त्या कामाचा मळवट मात्र कपाळभर फासतात. पण काही माणसं डोंगराएवढं काम करुनही  त्या कामाचा चिमूटभरसुद्धा अंगारा कधी कपाळाला लावत नाहीत. विजयबाबू ह्या दुसर्‍या कॅटेगरीत मोडणारे. त्यांनी कधी प्रसिद्धीचा फारसा सोस धरला नाही, की स्वतःवर कधी फुलंही उधळून घेतली नाहीत.
कोणत्याही गावाचं आभाळ श्रीमंत होण्यात त्या गावातील उंच इमारतींचं योगदान नसतं. त्या इमारतींच्या छताखाली नांदणारी माणसं कोणत्या उंचीची आहेत, त्यावर त्या गावाची उंची ठरत असते. विजयबाबूंनी आणि मोतीभाऊंनी मराठवाड्यातील ग्रामीण पत्रकारितेला उंची देण्याचं काम निष्ठेनं केलं. माऊलींचं पसायदान हेच दोघांच्याही जगण्याचं सूत्र असावं.
या सद् भाव जीवगत ।
सहजच अंगे प्रकटत ।
स्फटिकाची डोलत ।
दीप जैसे ॥
 असं माऊलींनी म्हटलं आहे. स्फटिकगृहीचे हे दिवे आणखी काही काळ तेवत राहायला हवे होते...पण दोघांच्याही जगण्याच्या वळणावरच सूर्यास्त दबा धरुन उभा होता !
विजयबाबू - मोतीभाऊ,
डरव  र्ीपशुशिलींशव ुरी ींहश लरश्रश्र...
र्धेीी र्ीीववशप वशरींह ीहेलज्ञशव र्ीी रश्रश्र...खीं ळी हरीव ीें लशश्रळर्शींश, र्ूेी हरव ीें वळश...थळींर्हेीीं र लहरपलश ीें ीरू ’ॠेेवलूश ’ ....!!!
मित्रांनो, शेवटचा नमस्कारही करण्याची संधी तुम्ही दिली नाहीत. मी तुमच्यावर रागावलो आहे.... फार फार रागावलो आहे !!!
-- जयप्रकाश दगडे,
ज्येष्ठ पत्रकार, लातूर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या