*पोलीस ठाणे, लातूर ग्रामीण येथे अवैध शस्त्र बाळगल्या प्रकरणी दाखल असलेल्या महत्त्वाच्या गुन्ह्यातील आरोपीस अटक*
लातूर (रिपोर्टर न्यूज़ बीयूरो )
या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक 24/02/2021 रोजी पोलीस ठाणे, लातूर ग्रामीण येथे गुरन 47/2021 कलम 3 (1), 25 भारतीय हत्यार कायदा प्रमाणे गुन्हा दाखल होता. सदर गुन्ह्यातील आरोपी नामे बाळा उर्फ प्रताप हणमंत पवार, वय-26 वर्ष ,रा.सारोळा,ता.जामखेड,जि. अहमदनगर हा गुन्हा घडल्यापासून म्हणजे तब्बल 07 महिन्यांपासून फरार होता.
पोलिस पथके विविध मार्गाने गोपनीय माहिती काढून सदर आरोपीचा शोध घेत असताना पथकाला माहिती मिळाली की, सदरचा आरोपी सध्या पिरंगुट,गणेश नगर ,पुणे येथे राहत असून एका कंपनीत कॅब चालक म्हणून काम करीत आहे. अशी माहिती मिळाल्याने पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे, उपविभागीय पोलिस अधिकारी (लातूर ग्रामीण) श्रीमती प्रिया पाटील मॅडम यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक गणेश कदम यांचे नेतृत्वात पोलीस अंमलदार येणकुरे, लखनगिरे, डिगोळे यांचे पथकाने सदर आरोपीस पोलीस ठाणे वाकड, पिंपरी चिंचवड हद्दीतून.21/09/2021 रोजी अटक करण्यात आली आहे.
सदर आरोपीस मा. न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने त्यास दिनांक.24/09/2021 पर्यंत PCR दिली आहे.
सदरचा आरोपी हा सराईत असून त्याच्यावर विविध पोलीस स्टेशनला अवैध शस्त्र बाळगणे, दरोडा टाकने यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.त्याची माहिती पुढील प्रमाणे.
*1)पोलीस ठाणे लातूर ग्रामीण*
गु.र.नं 47/2021 , कलम 3(1), 25 भारतीय हत्यार अधिनियम.
*2)पोलीस ठाणे किनगाव*
गुरंन 51/2016, कलम 395 भादवि व 3, 25 भारतीय हत्यार अधिनियम.
*3)पोलीस ठाणे रेणापूर*
गुरन 114/2016 कलम 395 भादवि, 3,25 भारतीय हत्यार अधिनियम.
*4)पोलीस ठाणे हिंजवडी( पुणे)*
गुरंन 695/21 कलम 3,25 भारतीय हत्यार अधिनियम.
*5)पोलीस ठाणे दत्तवाडी, पुणे*
गुरनं 3063/2015 कलम 37 (1) (7) बी.पी. ॲक्ट.प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
पुढील तपास लातूर ग्रामीणचे पोलीस अमलदार बी.पी.येणकुरे करीत आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.