औसा शहरातील औसा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग संदर्भात बैठक घेऊन औसेकरांशी चर्चा केली, सोमवारी पुन्हा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित केली आहे.
औसा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपूल बांधण्याचे नियोजन आहे. या नियोजित उड्डाणपुलावरून शहरवासीयांमध्ये दोन मतप्रवाह निर्माण झाले आहेत. काही नागरिकांचे म्हणणे आहे की उड्डाणपूलामुळे राष्ट्रीय महामार्गाशेजारील बाजारपेठ बंद पडेल, महामार्गालगतच्या जमीनीचे भाव गडगडून गुंतवणूक केलेल्या नागरिकांचे नुकसान होईल त्यामुळे उड्डाणपूल न करता रस्ता विस्तारित व्हावा. तर काही नागरिकांचे म्हणणे आहे की रस्ते सुरक्षेच्या व भविष्याच्या दृष्टीने हा उड्डाणपूल आवश्यक आहे.
हे दोन्ही मतप्रवाह असलेल्या जवळपास ४०० नागरिकांसोबत आमदार अभिमन्यु पवार च्या निवासस्थानी बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली व त्यांची भूमिका समजून घेतली. हा विषय औसा शहराच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असून सर्व बाजूंचा सारासार विचार करूनच निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यामुळे येत्या सोमवारी दोन्ही बाजूंचे ५ ते ७ प्रतिनिधी व नॅशनल हायवे ॲथॉरिटीचे वरिष्ठ अधिकारी यांची बैठक बोलावली आहे. त्या बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा होईल.असे आमदार पवार यांनी सांगितले #NationalHighways #PragatiKaHighway
Nitin Gadkari Devendra Fadnavis Chandrakant Patil BJP Maharashtra
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.