औसा नगर पालिकेला शासनाकडून 5 कोटी निधी प्राप्त असून सदर निधीतून जामा मस्जिद ते हनुमान मंदिर तिसरा टप्पा रुंदिकरण काम त्वरीत करा एम आई एम ची मागणी
औसा शहरातील मुख्यबाजार पेठेतील रस्त्यामुळे ग्रामिण भागातील येणाऱ्या जाणारे जनतेला अडणीस सामोरे जावे लागत आहे. तीसऱ्या टप्प्यातील रस्ता रुंदीकरण जामा मस्जीद ते हनुमान मंदीर पर्यंतचा हा रस्ता मुख्य बाजार पेठेचा असून हा 60 फुटाचा असून सदर रस्त्यास येणारी वाहतुक लक्षात घेता हा रस्ता अरुंद होत आहे. म्हणून तो 80 फुट पर्यंत फुटाचा करण्यात यावा. सिमेंट रोड न करता डांबरी रोड करण्यात यावे. सिमेंट रोड केल्यामुळे पाण्याची पातळी खालावली आहे व सिमेंट रस्त्यामुळे निसर्गावर परिणाम होऊन पाऊसही वेळेवर होत नाही. याबाबत पक्षामार्फत आपणास वेळोवेळी निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे. परंतु त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. म्हणून दि. 09/12/2021 रोजी रास्तारोको करून आपले लक्ष वेधले होते. त्यावेळेस आम्हास लेखी पत्र देऊन निधी नसल्याचे कळविले होते.
तरी सद्या औसा शहरात संदर्भ क्रं. 02 नुसार जागोजागी मुख्य ठिकाण नगर पालिकेला 5 कोटी निधी प्राप्त झाल्याचे फलक लावलेले आहेत. आपल्या म्हणण्यानुसार निधी नसल्यामुळे काम करण्यास अडचण येत आहे तरी सद्या औसा नगर पालिकेला शासनाकडून 5 कोटी निधी प्राप्त असून सदर निधीतून त्वरीत काम करण्यात यावा ही विनंती. अन्यथा एम. आय. एम. च्या वतीने नगर पालिकेवर गाढव मोर्चा काढण्यात येईल असा इशारा सय्यद मुजफ्फरअली इनामदार, एम. आय. एम. प्रमुख, औसा यांनी मुख्याधिकारी औसा याना निवेदन देऊन दिला आहे
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.