हासेगाव फार्मसीत राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत व्यसन मुक्ती कार्यक्रम

 हासेगाव फार्मसीत  राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत   व्यसन मुक्ती कार्यक्रम






           औसा (प्रतिनिधी ):   हासेगाव येथील श्री  वेताळेश्वर शिक्षण संस्था संचलित    लातूर कॉलेज ऑफ फार्मसी, हासेगाव महाविद्यालयात महाराष्ट्र शासन , जिल्हा चिकित्सक कार्यालय , लातूर अंतर्गत सर्वधर्म समभाव कला मंडळ खंडाळा ता. जि . लातूर यांच्या  संयुक्त विद्यमानाने राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत  तंबाकू व्यसन मुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले .             या कार्यक्रमात तंबाखू व तंबाखूचे दुष्परिणाम, मुली वाचवा ,मुलीला हि शिकवा ,मुलगा मुलगी सामान या विषयावर गीत ,पोवाडे ,पथनाटय या द्वारे विनोदी स्वरूपातून जनजागृती  विद्यार्थ्यांसमोर सादर करते नामांकित कलावंत लोकशाहीर अशोक शिंदे व त्याची सर्व टीम  यांनी सादर केले .            त्याच बरोबर या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे  लोकशाहीर अशोक शिंदे,प्रल्हाद पुरी ,श्री अण्णासाहेब आदमाने , श्री उत्तम साहेब , सौ . प्रभावती उबाळे ,  संस्थेचे कोषाध्यक्ष श्री शिवलिंग जेवळे, लातूर कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.श्यामलीला बावगे,  ,महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे  प्रोग्राम ऑफिसर प्रा. बनसोडे जी. राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व वालिंटिअर ,सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यां उपस्थित होते .       या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन कल्चरर इंचार्जे प्रा. बालाजी खवले यांनी केले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या