आझाद महाविद्यालयात अ विभागीय बुद्धिबळ स्पर्धा संपन्न
औसा_ स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अ विभागीय बुद्धिबळ स्पर्धा ४ व ५ जानेवारी रोजी येथील आझाद महाविद्यालयात उत्साहात संपन्न झाल्या.स्पर्धेत एकूण ११ महाविद्यालयांनी आपला सहभाग नोंदविला. स्पर्धेचे उद् घाटन मधुकर पवार (उपविभागीय पोलीस अधिकारी, औसा) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थाध्यक्ष संजय कुलकर्णी,प्राचार्य डॉ.ई.यू मासूमदार, उपप्राचार्य टी.ए जहागीरदार, निवड समिती प्रमुख प्रा डॉ.कारंजकर,क्रीडा संचालक प्रा डॉ.आदित्य माने,प्राध्यापक उपस्थित होते.स्पर्धेत जी.के जोशी (रात्रीचे) वाणिज्य महाविद्यालय लातूर यांनी विजेतेपद तर उपविजेतेपद दयानंद वाणिज्य महाविद्यालय यांनी मिळवले.दोन्ही संघांना प्राचार्य डॉ.ई.यू मासूमदार यांच्या हस्ते चषक देऊन गौरविण्यात आले.स्पर्धा यशस्वितेसाठी प्रा.डॉ आय.एम हाश्मी, प्रा.डी.ए शिंदे, प्रा.डॉ एस.व्ही बाडगिरे, प्रा.व्ही.जी जावळे, प्रा.एम.एम कोतवाल, प्रा.डॉ आर.व्ही सूर्यवंशी,प्रा.डॉ जे.डी साळूंके, प्रा.सौ व्ही.व्ही गायकवाड यांनी प्रयत्न केले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.