गुळखेडकरांच्या समस्या सोडवण्यासाठी कटीबद्ध..... मांजरा व्हाइस चेअरमन श्रीशैल्य उटगे
श्रीशैल्य उटगे यांनी जाणून घेतल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या
औसा प्रतिनिधी
औसा तालुक्यातील मांजरा परिवाराच्या परिसरात येणारे गुळखेडा हे गाव असून गावच्या अनेक समस्या होत्या गावकऱ्यांनी त्या समस्या मांजरा कारखान्याचे व्हाइस चेअरमन तथा जिल्हा अध्यक्ष काॅग्रेस श्रीशैल्य उटगे यांच्या समोर मांडल्या. यावेळी ऊसाची समस्या, ऊसाच्या गाड्यांचा अभाव, गावातील अंतर्गत रस्ते, लाईट, स्मशानभूमी, यासह अनेक समस्या गावकऱ्यांनी मांडल्या. या प्रसंगी बोलताना श्रीशैल्य उटगे म्हणाले की गुळखेडकरांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटीबद्ध असून गुळखेडा गाव हे मांजरा परिवाराच्या पठ्यात येत असल्याने ऊसाची कसल्याही प्रकारच्या ज्या काही समस्या असतील त्या तात्काळ सोडवण्यासाठी आम्ही पाठपुरावा करून सोडविण्यात येतील असे आश्वासन त्यांनी गुळखेडकरांशी संवाद साधताना सांगितले. गुळखेडा हे तीन-चार कारखान्याचे सभासद असून ऊसाचे क्षेत्रही जास्त आहे.त्यामुळे लवकरात लवकर ऊसांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. यावेळी मांजरा कारखान्याचे व्हाइस चेअरमन श्रीशैल्य उटगे, ओबीसी सेलचे प्रदेश सदस्य प्रा सुधीर पोतदार,औसा काॅग्रेस तालुकाध्यक्ष दंतोपंत सुर्यवंशी, मारूती महाराज साखर कारखाना संचालक सचिन पाटील, विलासराव देशमुख मंचाचे तालुकाध्यक्ष रवि पाटील गावचे सरपंच पती बबन चेंडके, उपसरपंच अमिन पटेल, ग्राम पंचायत सदस्य भास्कर यादव,माजी सरपंच दगडू गिराम, धनराज रोंगे, औसा तालुका माध्यम मिडीया प्रमुख पांचाळ विठ्ठल, तंटामुक्ती अध्यक्ष नानासाहेब बेले,सुधीर भोसले, शिवाजी बेले, अरविंद भोसले, सचिन गिराम, लतिफ पटेल, बालाजी गिराम, उत्तम भोसले, दिनकर बेले, गजेंद्र कोराळे, अमोल शिंदे, ज्ञानोबा शिंदे, विष्णू भोसले यांच्या सह कारखान्याचे परिसरातील कर्मचारी ,व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमांचे प्रास्ताविक सचीन पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन धनराज रोंगे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी विठ्ठल पांचाळ यांनी परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.