सुरक्षा साधनांचा वापर करून कोवीड१९ ची लागण न
झालेल्या रूग्णावर उपचार करावेत
शस्त्रक्रीयेपुर्वी रूग्णांची कोवीड१९ तपासणी करण्याची
अनुमती मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार
वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख
लातूर (प्रतिनिधी ) मंगळवार दि.९.६.२० :
खाजगी व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांनी सर्व सुरक्षा साधनांचा वापर करून कोवीड१९ ची लागण न झालेल्या रूग्णावर उपचार करावेत असे आवाहन करून कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रीया करण्यापुर्वी संबंधित रूग्णांची सशुल्क कोवीड १९ तपासणी करण्या बाबत अनुमती मिळवुन देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाईल असे आश्वासन राज्याचे वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिले आहे.
लातूर येथील इंडीयन मेडीकल असोशिएशन, दंतवैदयकीय, आयुवेदीक, होमिवोपॅथी आदी संघटनाच्या पदाधिकारी सोबतच्या बैठकीत वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख बोलत होते.
बैठकीस मनपा आयुक्त देविदास टेकाळे, विलासराव देशमुख शासकीय वैदयकीय विज्ञान संस्थाचे अधिष्ठाता गिरीश ठाकूर, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. ढगे, आयएमए अध्यक्ष डॉ.विश्वास कुलकर्णी, मावळते अध्यक्ष अजय जाधव, राज्य कार्यकारीणी सदस्य कल्याण बरमदे, डॉ. संजय पौळ, डॉ. राजकूमार दाताळ, डॉ.पुरूषोत्तम दरक, डॉ. कातीलाल शर्मा, डॉ. गव्हाणे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हा शल्यचिकीत्सक, मनपा आयुक्त, विलासराव देशमुख शासकीय वैदयकीय विज्ञान संस्थेचे अधिष्टाता यांनी समन्वय समिती स्थापन करून वेळोवेळी खाजगी डॉक्टर यांच्या अडचनी समजून घ्याव्यात. डॉक्टरांनी सुरक्षा साधनांचा वापर करून करोना नसलेल्या रूग्णांना सेवा द्यावी, शहरातील खाजगी हॉटेल अधिग्रहित करून विलगीकरणासाठी ज्यांची पैसे भरण्याची क्षमता आहे अशांना उपलब्ध करून द्यावेत, गंभीर आणि अतीगंभीर रुग्णांसाठी पर्यायी लागणाऱ्या औषधांचा साठा ऊपलब्ध करून ठेवावा ऐनवेळेस धावपळ होणार नाही याची काळजी घ्यावी, क्वारंटाईन सेंटरमध्ये रूग्णाची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणारं नाही याची दक्षता घ्यावी आदी सुचना पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी या बैठकी दरम्यान संबंधितांना केल्या. शहरातील डॉक्टरांना कोणतीही अडचण आल्यास त्यांनी मला फक्त एक एसएमएस करावा मी त्यांची अडचण तातडीने दूर करण्याचा प्रयत्न करीन असे सांगून मी आपल्या सेवेसाठी सदैव तयार असल्याचे त्यांनी यावेळी त्यांनी म्हटले.
या बैठकी दरम्यान इतर खाजगी प्रयोगशाळांना कोवीड१९ चाचणी करण्याची परवानगी द्यावी, रॅपिड टेस्ट करण्याची अनुमती द्यावी, खाजगी रूग्णालयातही कोवीड रूग्णांच्या उपचारात परवानगी द्यावी, पिपीई किट वापरून पॉझीटीव्ह रूग्णांची तपासणी केली तर क्वारंटाईन करू नये, खाजगी रूग्णालयातही कोवीडसाठी बेड आरक्षीत करावेत, ज्यामुळे पैसे भरण्याची क्षमता असलेल्या रूग्णांची सोय होईल, खाजगी डॉक्टरांनाही इन्शुरन्स कवच द्यावे, पीपीई किटचा जीएसटी माफ करावा आदी मागण्या डॉक्टर संघटनाच्या प्रतिनिधींनी यावेळी केल्या आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.