ऑनलाईन शिक्षण प्रणाली कार्यशाळेत औशात प्रतिसाद औसा





ऑनलाईन शिक्षण प्रणाली कार्यशाळेत औशात प्रतिसाद औसा प्रतिनिधी/
 कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शिक्षण क्षेत्रालाही झळ बसली असून 2020_2021 या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून महाराष्ट्र विज्ञान महामंडळाने ऑनलाईन शिक्षण प्रणाली प्रभावीपणे राबविण्यासाठी औशात ऑनलाईन कार्यशाळेच्या आयोजित केलेल्या उपक्रमास शिक्षणप्रेमी ,पालक, विद्यार्थी वर्गातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला ,विद्यार्थी व पालक वर्गातील संभ्रम दूर व्हावा म्हणून औसा तालुका एम के सी एल च्या माध्यमातून औसा शहर व परिसरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन कार्यशाळेतून एमकेसीएल चे विभागीय संचालक  महेश पत्रिके यांनी संबोधित केले ,डिजिटल शैक्षणिक साहित्य तयार करण्यासाठी शिक्षकांनी पुढे यावे यासाठी प्रमाणित डिजिटल साहित्य कोणते व त्यांचा वापर कसा करता येईल याबाबत सविस्तर माहिती  विशद केली, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक  अडचण दूर व्हावी, कमी खर्चात विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी वापरावयाची वेबसाईट ,मोबाईल ॲप बाबत सविस्तर माहिती दिली, ऑनलाईन परीक्षा पद्धती ऑनलाईन शिक्षण पद्धतीत पालकांची भूमिका अशा अनेक प्रश्नांची उकल महेश पत्रिके यांनी कार्यशाळेतून देताना पालक व विद्यार्थी या कार्यशाळेमुळे अनेक शिक्षक, विद्यार्थी _पालकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत, या कार्यशाळेत तालुक्यातील प्राध्यापक, शिक्षक, मुख्याध्यापक, संचालकासह शिक्षणप्रेमी पालक यांच्यासह कम्प्यूटर पार्क ,फ्रेंड्स कंप्यूटर, महेश्वरी कंप्यूटर ,अमेय कंप्यूटर,साई कंप्यूटर ,श्री कम्प्युटर औसा, चेत कम्प्युटर व सोफ्टेक कॉम्प्युटर किल्लारी, श्री रामनाथ कम्प्युटर अलमला एस के ज्ञानदीप कम्प्युटर मातोळा, शिवकवच कम्प्युटर उजनी, प्रकाश कम्प्युटर खरोसा, निखत कम्प्युटर जवळगा पो ,श्रीराम कम्प्युटर शिंदाळा लो अशा तालुक्यातील 15 संगणक केंद्राच्या संचालकांनी सहभाग नोंदविला


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या