अर्सेनिक अल्बम ३० रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त औषध
आमदार धिरज विलासराव देशमुख यांचे हस्ते होमिओपॅथिक औषधीचे वाटप
मुरुड (प्रतिनीधी) :
देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असुन आतापर्यंत कोरोनाबाधिंताच्या संख्येने दोन लाखाचा आकडा पार केला आहे. मात्र ज्यांची रोगप्रतिकार शक्ती चांगली आहे ते व्यक्ती यावर यशस्वीपणे मात करीत असल्याचे समोर आल्याने ही क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यादृष्टीने लातूर तालुक्यातील करकट्टा येथिल ग्रामस्थांना तसेच कोविड योध्दा म्हणून काम करणारे पोलिस कर्मचारी, आशा वर्कर यांना लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांचे हस्ते या औषधाचे मोफत वाटप करण्यात आले.
या रोगप्रतिकार शक्ती वाढविण्याकरीता होमिओपॅथिक अर्सेनिक अल्बम ३० या गोळया उपयुक्त आहेत. त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती नक्की वाढेल. याचा फयदा कोरोनाच्या या लढयात होणार आहे. या गोळयांचे सेवन आपण करावे व आपल्या आरोग्याची काळजी प्रथम घ्यावी, असे आवाहन आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी केले.
लातूर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने औषधी उपलब्ध करण्यात आली. याकामी लातूर जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ. दिनेश नवगीरे यांनी परिश्रम घेतले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य दिलीप नाडे, पोलिस निरीक्षक महादेव गोमारे, वैद्यकिय अधिक्षक डॉ. लक्ष्मण देशमुख, डॉ दिनेश नवगीरे, राम गोरे, सुनिल पाटील व कर्मचारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.