केंद्र सरकारने कांदा, तेल ,डाळी बटाटा यांना जीवनावश्यक वस्तू कायद्याच्या जोखडातून मुक्त केले -पाशा पटेल
लातुर : कांदा, तेल, डाळी ,बटाटा यासारख्या शेतमालाला जीवनावश्यक वस्तू कायद्यात घेऊन केंद्र सरकारने शेतकऱ्यांना कोंडीत पकडले होते. परंतु मोदी सरकारने नुकतेच या शेतमालाला जीवनावश्यक वस्तू कायद्याच्या कचाट्यातून मुक्त करुन शेतकरी चळवळीची अनेक वर्षांची मागणी पूर्ण केली. त्यामुळे भविष्यात शेतकर्यांना आर्थिक उभारी घेता येईल असा विश्वास शेतकरी नेते तथा राज्य कृषीमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी लातूर येथे शेतकरी उत्पादक कंपनीच्या प्रतिनिधी बैठकीत व्यक्त केला.
फिनिक्स फाऊंडेशन लोदगा लातूर येथे मराठवाड्यातील नांदेड ,परभणी, हिंगोली, लातूर , उस्मानाबाद ,बीड जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपनीच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली . यात केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करून केंद्राच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला. केंद्राच्या या निर्णयामुळे देशभरातील शेतमाल वाहतुकीचे सर्व निर्बंध उठवण्यात आले . तसेच शेतमाला उत्पादनाला एकाच राज्यात कर लागेल , आत्तापर्यंत शेतमालाच्या साठवणुकीची मर्यादा असल्याने व्यापारी शेतमाल साठवणूक करत नव्हते , अधिकारी जीवनावश्यक वस्तू कायद्याचा आधार घेऊन साठवलेल्या शेतमाल कधीही जप्त करतील याची भीती त्यांच्या मनात होती त्यामुळे तेजी असो वा मंदी व्यापारी शेतमाल साठवणूक करण्यास धजावत नव्हते आता केंद्राने शेतमाल साठवणुकीवरील बंदी उठवल्यामुळे उठवल्यामुळे व्यापारी मोठ्या प्रमाणात शेती मालाची साठवणूक करतील याचा निश्चितच फायदा शेतकर्यांना होणार आहे . त्याच बरोबर ग्रामीण भागातील शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी केंद्र सरकारने अनेक पावले उचलली असून शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींना केंद्रामार्फत प्रशिक्षण देणे कंपनीच्या सचिवाचा पगार देणे शेतकरी कंपनीला लागणाऱ्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मोठ्या आर्थिक निधीची तरतूद केल्याने भविष्यात गावागावात तयार झालेल्या शेतकरी उत्पादक कंपन्या ह्या ताकदीने काम करतील शिवाय चांगल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्ये शासन व खासगी उद्योजकही मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक करतील असा विश्वास पाशा पटेल यांनी व्यक्त केला . यावेळी अच्युत गंगणे ,प्रल्हाद इंगोले ,शिवराज खरबड, दीपक पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले .
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.