लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील आंदोरा गावात एक कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने प्रशासनाने आंदोरा गाव केले सील
प्रतिनिधी=मुख्तार मणियार औसा लातूर
लातूर जिल्ह्यातीलऔसा तालुक्यातील आंदोरा गावात एक पंचावन्न वर्षीय महिला कोरोना पाॅझिटिव्ह आढळल्याने याची दक्षता संपूर्ण परिसरात घेतली जात आहे मंगळवार दिनांक 9जुन रोजी अहवाल प्राप्त होताच प्रशासनाने तातडीने काही तासांतच आंदोरा गाव गाठून रुग्ण मिळून आलेला भाग सील केला असुन बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या बावीस पैकी आठ जणांना प्रशासकिय विलिनीकरणात तर चौदा लोकांना होमकवारंटाईम केले आहे.आंदोरा येथील एक महिला मार्च महिन्यात मुंबई येथून आली होती.मात्र काही दिवसांपूर्वी ती उमरगा तालुक्यातील सास्तूर गावातील आपल्या नातेवाइकांना भेटण्यासाठी गेली अशी माहिती मिळाली असून तिथून आल्यावर तिला ताप,खोकला अशी लक्षणे दिसून येताच लातूरला हलविण्यात आले होते.त्या महिलेच्या संपर्कातील बावीस पैकी आठ जणांना ताब्यात घेऊन त्यांची प्रशासकिय विलिनीकरण कक्षात रवानगी केली तर चौदा लोकांना होमकवारंटाईम केले आहे.आंदोरा गावात रुग्ण मिळाल्याने शेजारील भादा, बोरगाव, वडजी, ही गावे सजग झाली असून खबरदारी म्हणून या कोरोना पाश्र्वभूमीवर गावे पांच दिवस स्वंयघोषीत बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायत व आपत्ती निवारण समितीने आणि ग्रामस्थांनी घेतला आहे.यावेळी उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, तहसिलदार शोभा पूजारी, गटविकास अधिकारी सुर्यकांत भुजबळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ आर आर शेख, वैद्यकीय अधिकारी डॉ रेड्डी, पंचायत समिती सदस्य रेखाताई नागराळे, शिवकुमार नागराळे, सरपंच अजगर पटेल ,तलाठी भागवत सोनवते आदिनी घटनास्थळी धाव घेऊन उपाययोजना केल्या आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.